Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
टिपस्टर Ahmed Qwaider नं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितलं आहे की सॅमसंग गॅलेक्सी एस२४ अल्ट्रा मध्ये कॅमेऱ्याचा डिफॉल्ट रिजोल्यूशन २४ मेगापिक्सल असेल. हे जर खरं ठरलं तर गॅलेक्सी एस२३ अल्ट्रा च्या तुलनेत हा मोठा अपग्रेड असेल, जो जुन्या फोनमध्ये १२ मेगापिक्सल आहे. Apple च्या नव्या iPhone 15 सीरिजमध्ये देखील २४ मेगापिक्सलच्या इमेजेस बाय डिफॉल्ट कॅप्चर होतात.
पुढे टिप्सटरनं दावा केला आहे की गॅलेक्सी एस२४ मध्ये एक फोटो रीमास्टर फिचर दिलं जाईल. हे एक एआय आधारित फिचर असेल जे फोटो मधील शॅडो आणि रिफ्लेक्शन आपोआप हटवण्यास मदत करेल. ह्यात पोर्ट्रेट, रीमास्टर किंवा डिलीट अश्या तीन सेटिंग मिळतील. तसेच हँडसेटमध्ये RAW इमेजेस मधील रंग शाबूत ठेवत लाइट अॅड्जस्ट करण्यासाठी एनडी अर्थात नॅचरल डेन्सिटी फिल्टर मिळेल.
आगामी Galaxy S24 Ultra मध्ये २०० मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात एआय सपोर्टेड ऑब्जेक्ट इंजिन देण्यात येईल. ह्या कॅमेरा सेटअपमध्ये १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि ५० मेगापिक्सलची ५x टेलीफोटो लेन्स आणि १० मेगापिक्सलची १०x टेलीफोटो लेन्स मिळेल. रियर कॅमेरा सेटअपमध्ये ८के व्हिडीओ रेकॉर्ड करता येईल, तेही ऑप्टिकल इमेज स्टेबिलायजेशनसह.
Samsung चा आगामी Galaxy S24 Ultra स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या नव्या Snapdragon 8 Gen 3 चिपसेटसह बाजारात येईल, ज्यात ओव्हर क्लॉक जीपीयू आणि सीपीयू दिला जाईल. फोनमध्ये टायटेनियम फ्रेमचा वापर केला जाईल आणि नवीन EV battery टेक्नॉलॉजी दिली जाईल, ज्यामुळे बॅटरी लाइफमध्ये सुधारणा होऊ शकते.