Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शताभिषा नक्षत्र मध्यरात्री १ वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वाभाद्रपद नक्षत्र प्रारंभ, वज्र योग रात्री ९ वाजून ३२ मिनिटांपर्यंत त्यानंतर सिद्धी योग प्रारंभ. तैतील करण मध्यरात्री सव्वा तीन वाजेपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र दिवस-रात्र कुंभ राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-०६
- सूर्यास्त: सायं. ६-०४
- चंद्रोदय: सकाळी ११-४८
- चंद्रास्त: रात्री ११-३९
- पूर्ण भरती: पहाटे ३-३७ पाण्याची उंची ४.५३ मीटर, दुपारी ३-५३ पाण्याची उंची ३.६५ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी १०-०१ पाण्याची उंची १.६४ मीटर, रात्री ९-३८ पाण्याची उंची १.२६ मीटर.
दिनविशेष: चंपाषष्ठी, स्कंदषष्ठी, मार्तंडभैरवोत्थापन, खंडोबा नवरात्र समाप्ती.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १८ मिनिटांपासून ६ वाजून १३ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजल्यापासून दुपारी २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून २५ मिनिटांपर्यंत ते ५ वाजून ५२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून ७ मिनीटे ते ८ वाजून २५ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ. सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत यमगंड.दुर्मुहूर्त काळ संध्याकाळी १२ वाजून ३८ मिनिटे ते १ वाजून २० मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी २ वाजून ४२ मिनीटे ते ३ वाजून २३ मिनिटांपर्यंत. पंचक पुर्ण दिवस असणार आहे.
आजचा उपाय: शंभो शंकराला शमीचे पान अर्पण करा आणि माता पार्वती व शिवाची उपासना करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)