Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nothing Phone (2a) च्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत, त्यामुळे कंपनी हा हँडसेट लवकरच लाँच करण्याची शक्यता वाढली आहे. ऑनलाइन लीक्सच्या माध्यमातून फोनचे स्केच देखील समोर आले आहेत. हा एक बजेट फोन असेल. अँड्रॉइड डेव्हलपर Dylan Roussel नं ह्याच्या डिजाइनची माहिती दिली आहे. त्यानुसार फोनचा रियर कॅमेरा मॉड्यूल पॅनलच्या मध्यभागी आणि हॉरिजॉन्टली ठेवला जाईल. ह्यात दोन लेन्स दिसतील.
इतकेच नव्हे तर अजून एका टिपस्टरनं फोनचा प्रोटोटाइप देखील शेयर केला आहे. ज्यात ह्याचा ड्युअल कॅमेरा सेटअप दिसत आहे. जिथे LED फ्लॅश देखील दिसत आहे. विशेष म्हणजे ह्यावेळी कॅमेऱ्याची भोवती Glyph LED आहेत, ज्या जुन्या दोन्ही मॉडेल्स मध्ये देण्यात आल्या होत्या. ह्या एलईडी लाइट्स अॅप नोटिफिकेशनना सपोर्ट करतील.
आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार फोनचे कोडनेम Pacman सांगण्यात आलं आहे. डिव्हाइसमध्ये MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर मिळू शकतो. सोबत Mali G610 MC4 GPU ग्राफिक्ससाठी दिला जाऊ शकतो. कंपनीनं ह्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. शक्यतो हा फोन फेब्रुवारी २०२४ मध्ये Mobile World Congress (MWC) दरम्यान सादर केला जाऊ शकतो. Nothing नं देखील फेब्रुवारीमधील एका इव्हेंटचा उल्लेख केला होता.