Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये विविध पदांसाठी भरती; पगारही उत्तम, आजच करा अर्ज

11

ZP Ratnagiri Bharti 2023 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंबकल्याण सोसायटी, रत्नागिरी यांच्यातर्फे उमेदवारांकडून निव्वळ करार तत्त्वावर खलील पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरचे अर्ज पोस्टाने किंवा प्रत्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी या कार्यालयाकडे सादर करायचे आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण संगमेश्वर, लांजा, राजापूर, गुहागर, अशा विविध ठिकाणी, वैद्यकीय अधिकारी, किटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा विविध पदांवर ही भरती केली जाणार आहे.

पदभरतीचा तपशील :

01. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : १७ जागा
02. किटकशास्त्रज्ञ (Entomologists) : ०९ जागा
03. सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (Public Health Specialist) : ०९ जागा
04. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) : १८ जागा

एकुण रिक्त पदे : ५३ जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • वैद्यकीय अधिकारी पदासाठी : MBBS / BAMS उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत.
  • किटकशास्त्रज्ञ पदासाठी : एम एस्सी सह प्राणीशास्त्र मध्ये किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
  • सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ पदासाठी : कोणत्याही वैद्यकीय पदवीधर सह आरोग्यांमध्ये MPH / MHA / MBA उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी : बारावी + डिप्लोमा इन लॅब टेक्निशियन सह अनुभव आवश्यक असणार आहे .


अर्ज शुल्काविषयी :

जाहिरातीमध्ये नमुद केल्यप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज ‘जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी’ या पत्यावर २६ डिसेंबर २०२३ पर्यंत सादर करायचे आहेत.
सदर पदभरतीसाठी खुल्या प्रवर्गाकरीता १५० रुपये तर राखची प्रवर्ग करीता १०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल.

मिळणार एवढा पगार :

  • वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) :एमबीबीएस – ६०,००० रुपये / बीएएमएस – २५,००० रुपये + (१५००० भत्ता)
  • किटकशास्त्रज्ञ (Entomologists) : ४०,००० रुपये
  • सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (Public Health Specialist) : ३५,००० रुपये
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) : १७,००० रुपये

रत्नागिरी जिल्हा परिषदेअंतर्गत होणार्‍या या पदभरती विषयक पुढील सर्व सूचना जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येतील. याबाबत अर्जदारास कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही.

महत्त्वाच्या लिंक्स :

पदभरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटला १ भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटला २ भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.