Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मोटारसायकल चोरणार्या आंतरराज्यीय टोळीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, 42 दुचाकीसह 21 लाखाचा मुद्देमाल केला जप्त…..
बुलढाणा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,बुलढाणा जिल्हयामध्ये होणाऱ्या मोटार सायकल चोरीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक सुनिल कडासने,अपर पोलिस अधीक्षक,खामगाव अशोक थोरात, , अपर पोलिस अधिक्षक,बुलढाणा बाबुराव महामुनी, यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदारांचे विशेष पथक स्थापन करुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे अशोक लांडे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे नेतृत्वामध्ये पथक स्थापन करुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कारवाई सुरु होती. सदर पथकाने अभिलेखावरील आरोपी तपासले तसेच गोपनिय बातमीदार कार्यान्वीत केले. दरम्यान पथकास मिळालेल्या गोपनीय व खात्रीशीर माहितीनुसार सदर कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे
१) शत्रुघ्न रामचंद्र सोळंके वय 28 वर्ष रा. पिंपळगाव काळे ता. जळगाव जामोद ह.मु. रिधोरा ता. मोताळा जि बुलढाणा
२)गंगाराम इकराम पावरा वय 20 रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव
३) तुळशीराम इकराम पावरा वय 24 वर्ष रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव
४) सिताराम लेदा मुझाल्दे वय 24 वर्ष, रा. शिरवेल महादेव ता. भगवानपुरा जि. खरगोन मध्यप्रदेश
यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन विविध कंपनीच्या 42 दुचाकी किंमत अंदाजे 21,00,000/- रुपये त्यात महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हयातील 06, जळगांव जिल्हयातील 09, नाशिक जिल्हयातील 04, मध्यप्रदेश राज्यातील 16 व 7 मोटार सायकलचा अभिलेख मिळुन आला नाही (आर टी ओ कार्यालयाकडून माहिती मिळविण्याची प्रक्रिया सुरु आहे.) विशेष म्हनजे आरोपी हे निर्जन स्थळी पार्क केलेल्या मोटारसायकल चोरायचे व त्या कमी पैशात बाहेर राज्यात तसेच बाहेर राज्यामध्ये चोरलेल्या महाराष्ट्रात विक्री करायचे.
परंतु स्थानिक गुन्हे शाखेतील पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीप्रमाणे दिनांक 15/12/2023 रोजी आरोपी शत्रुघ्न रामचंद्र सोळंके वय 28 वर्ष रा. पिंपळगाव काळे ता. जळगाव जामोद ह.मु. रिधोरा ता. मोताळा हा विना कागदपत्राची मोटारसायकल विक्री करीता मोताळा परिसरात फिरत आहे. अशा गोपनिय माहितीवरुन त्यास ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातील मोटारसायकलचा अभिलेख पाहीला असता जळगांव जामोद येथील ग्राम वडशिंगी येथून सदरची मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदर बाबत पोलिस स्टेशन जळगांव जामोद येथे गुन्हा दाखल आहे. आरोपी शत्रुघ्न यास विश्वासात घेवून कौशल्यपुर्ण विचारपूस केली असता, सदर मोटार सायकल चोरीच्या रॅकेट मध्ये त्याला आणखी 3 साथीदार त्याला मदत करायचे आरोपीतांकडून आज पावेतो केलेल्या तपासामध्ये एकूण 42 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून त्यात महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा, जळगांव, नाशिक तसेच मध्यप्रदेशातील मोटार सायकल चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. वरील नमुद चारही आरोपींना तपास दरम्यान अटक करण्यात आली असून पुढील तपास पो.स्टे. जळगांव जामोद येथील पोलिस निरीक्षक दिनेश झांबरे यांचे मार्गदर्शनात सपोनि सागर भास्कर व पोलिस अंमलदार उमेश शेगोकार हे करीत आहेत. आरापी 1 ते 3 यांना मा. विदयमान न्यायालय, जळगांव जामोद येथे हजर केले असता तपासाची गांर्भीयता पाहता मा. न्यायालयाने त्यांना दिनांक 21/12/2023 पावेतो पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला आहे. आरोपी क्रमांक 4 यास दिनांक 20/12/2023 रोजी गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधिक्षक खामगाव अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, बि. बी. महामुणी, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अशोक लांडे यांच्या नेतृत्वात नंदकिशोर काळे, सपोनि निलेश सोळंके, श्रीकांत जिंदमवार पोउपनि, पोलिस अंमलदार रामविजय राजपूत, दशरथ जूमडे, दिपक लेकुरवाळे, दिगंबर कपाटे, जगदेव टेकाळे, गणेश पाटील, पुरूषोत्तम आघाव, अनंत फरतडे, दिपक वायाळ, मनोज खर्डे, चालक पोकॉ विलास भोसले, सुरेश भिसे, सायबर पो.स्टे. चे राजु आडवे, अमोल तरमळे, संदीप शेळके व योगेश सरोदे यांनी केली.
जिल्हा पोलिस बुलढाणा यांनी जनतेला आवाहन केले की, दुचाकी सि.सी.टि.व्ही कॅमेऱ्याच्या निगराणी मध्ये पार्क करावी तसेच त्यास बाजार मध्ये उपलब्ध असलेले व्हील लॉकचा वापर करावा. कोणताही इसम विनाकागदपत्राची गाडी विक्री करीत असल्यास ती खरेदी करु नये/गहाण ठेवू नये तसेच संशयास्पद वाटणाऱ्या इसमांबददल किंवा त्यांचे ताब्यातील मोटार सायकलबाबत स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील फोन क्रमांक 07262-242738 वर/प्रत्यक्ष येऊन अवगत करावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल