Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सिंगल चार्जमध्ये २५ दिवस चालेल Fire Boltt Armour स्मार्टवॉच; १४९९ रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवरून होणार विक्री

6

Fire-Boltt नं स्मार्टवॉच सेग्मेंटमध्ये नवीन विअरबेल सादर केला आहे. कंपनीच्या नव्या विअरेबल Fire-Boltt Armour मध्ये १.६ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात ६०० निट्स पीक ब्राइटनेस आहे. ह्यात ४०० x ४०० पिक्सल रिजॉल्यूशन देण्यात आलं आहे. वॉचची डिजाइन आकर्षक आहे. हा ब्लूटूथ कॉलिंग आणि बिल्ट-इन माइकसह आला आहे. चला जाणून घेऊया ह्याचे सर्व फीचर्स.

Fire-Boltt Armour Price

Fire-Boltt Armour ची किंमत भारतात १४९९ रुपये आहे. हा कंपनीनं Black, Camo Black, Green, Gold Black, आणि Silver Green कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. स्मार्टवॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त Amazon ई-कॉमर्सवरून देखील विकत घेता येईल.

Fire-Boltt Armour Specifications

Fire-Boltt Armour मध्ये वर्तुळाकार डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात स्क्रॅच रेजिस्टंट डिजाइन देण्यात आली आहे. तसेच फुल मेटल केस आणि ड्युरेबल ग्लास मिळते. कंपनीनं हे वॉच अनेक स्ट्रॅप कलरसह लाँच केलं आहे. Fire-Boltt Armour चे स्पेसिफिकेशन्स पाहता, हा १.६ इंचाच्या डिस्प्लेसह येतो. डायल सर्क्युलर देण्यात आला आहे. ह्यात नेव्हिगेशनसाठी कंपनीनं एक मोठा क्राउन बटन दिला आहे. वॉचमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. हा इनबिल्ट मायक्रोफोन आणि स्पिकरसह आला आहे. ह्यात ब्लूटूथ कॉलिंग आणि व्हॉइस असिस्टंट फंक्शन देखील आहेत. स्मार्टवॉचमध्ये कंपनीनं अनेक कलर कॉम्बिनेशन दिले आहेत ज्यामुळे ह्याचा लुक खूप आकर्षक वाटतो.

स्मार्टवॉच अनेक प्रकारे हेल्थ मॉनिटर देखील करतो. ह्यात हेल्थ फीचर्स जसे की हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग, SpO2 लेव्हल इत्यादी आहेत. ह्यात १०० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. तसेच स्मार्ट नोटिफिकेशन्स, वेदर अपडेट, कॅल्क्युलेटर, म्यूजिक, कॅमेरा कंट्रोल सारखे अनेक फीचर्स आहेत. बॅटरी लाइफ पाहता ह्यात ६००एमएएच बॅटरी आहे, ही ८ दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते. ही क्लासिक मोडची बॅटरी लाइफ आहे. ब्लूटूथ कॉलिंगसह हे वॉच ५ दिवसांपर्यंत चालू शकतं. तसेच स्टँडबाय टाइम २५ दिवस आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.