Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अनेकांना धमक्या, भांडण नित्याचे झाले होते. त्यात मागील काही दिवसांपूर्वी पोलिसांची धाड पडल्याने व्यवसायात नुकसान झाले होते. ही माहिती घरासमोर राहणाऱ्या अंभोरे कुटुंबियांनी पोलिसांना दिली असल्याचा संशय वाढल्याने त्याचा राग निर्माण झाला होता. त्यात अंभोरे यांच्या कुत्र्याने कोंबडी पकडल्याची ठिणगी पडली आणि वादाला सुरुवात झाली. मंगळवारी रात्री अंभोरे कुटुंबीय घरासमोर शेकोटी करून बसले असताना चंदन गुजर याने वाद घालत मारहाण केली. यात किशोर अंभोरे यानेही प्रत्युत्तर देत चंदनला मारहाण केली. हाच राग धरत चंदन गुजरने त्याची मेक्सिमो गाडी चारचाकी काढली आणि थेट अंभोरे कुटुंबियांच्या अंगावर घातली. ही जोरदार धडक बसल्याने शामराव लालू अंभोरे यांना जबरदस्त मार लागला.
अंभोरे कुटुंबियांना अनुसया अंभोरे (६७) यांनी त्यांना उचलण्यासाठी प्रयत्न करताना चंदन गुजरने पुन्हा गाडी परतवून त्यांच्या अंगावर घातली. यात दोघेही मृत्यूमुखी पडले. आरोपी चंदनची काकू अनारकली मोहन गुजर (५५) या भांडण सोडविण्यासाठी गेल्या. मात्र झटापटीत त्यांनाही आरोपीने वाहनाने चिरडले. यात त्यांचाही मृत्यू झाला. तीन जण मृत्युमुखी पडल्याने एकच गोंधळ उडाला. अंभोरे कुटुंबातील सदस्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताच आरोपीचे वडील राधे (७०) शाम गुजर (६५) यांनी कुऱ्हाड फेकून मारल्याने एकास जखमी केले. चंदनची गाडी या धावपळीत खड्ड्यात गेली आणि तो पळून गेला.
हा प्रकार शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांना समजताच आपल्या कार्यकर्त्यांसाह दाखल झाले. त्यांनी तातडीने विविध वाहनातून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र यातील शामराव अंभोरे (७०) अनुसया अंभोरे (६७) आणि अनारकली गुजर (५५) यांचा मृत्यू झाला. तर जखमी किशोर अंभोरे, उमेश अंभोरे व शारदा अंभोरे या जखमीना उपचार देऊन अमरावती सामान्य रुग्णालयात पाठविल्यात आले. घटनास्थळी आज पोलीस अधीक्षक यांनी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा केला. यासह लपून बसलेल्या दोन्ही आरोपींना चंदन गुजर आणि राधेश्याम गुजर यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास खल्लार पोलीस करीत आहेत.