Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फोन बिघडला तर घरपोच मिळेल सर्व्हिस; ९ हजारांमध्ये आला नवा स्वदेशी स्मार्टफोन

9

लावा ब्रँडनं आज नवीन Lava Yuva 3 Pro भारतीय बाजारात सादर केला आहे. हा बजेट रेंजमध्ये युजर्सना आकर्षित करू शकतो. फोनमध्ये हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले, ८ जीबी रॅम, ५००० एमएएचची बॅटरी, १८ वॉट फास्ट चार्जिंग, ५०मेगापिक्सल कॅमेरा आणि प्रीमियम ग्लास बॅक डिजाइन मिळते. चला, जाणून घेऊ लावा युवा ३ प्रोचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.

Lava Yuva 3 Pro ची किंमत आणि उपलब्धता

लावा युवा ३ प्रो मोबाइल कंपनीनं सिंगल स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आणला आहे. डिवाइसचा एकमेव मॉडेल ८ जीबी रॅम+ १२८ जीबी स्टोरेज मॉडेल ८,९९९ रुपयांना मिळेल. फोनची विक्री ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर सुरु करण्यात आली आहे. स्मार्टफोनसाठी युजर्सना डेजर्ट गोल्ड, फॉरेस्ट विरिडियन आणि मीडो पर्पल सारखे तीन कलर ऑप्शन मिळतील. विशेष म्हणजे कंपनी आपल्या लावा युवा ३ प्रो सह होम सर्व्हिस देत आहे. म्हणजे फोन खराब झाला तर घरातून पिकअप करून रिपेअर केला जाईल.

Lava Yuva 3 Pro चे स्पेसिफिकेशन्स

लावाच्या नवीन मोबाइलमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. जो १६०० x ७२० पिक्सल रिजॉल्यूशन, पंच होल डिजाइन आणि ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २६९ पीपीआय पिक्सल डेंसिटीला सपोर्ट करतो. डिवाइस अँड्रॉइड १३ वर आधारित आहे. त्याचबरोबर ब्रँड २ वर्ष सिक्योरिटी अपडेट्स देणार आहे. डिव्हाइसमध्ये Unisoc T616 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. सोबत ८ जीबी रॅम व १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. त्याचबरोबर ८ जीबी व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट पण आहे. म्हणजे एकूण १६ जीबी पर्यंत रॅम वापरता येईल.

Lava Yuva 3 Pro मध्ये LED फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी आणि एक सेकंडरी कॅमेरा आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. लावा युवा ३ प्रो ५०००एमएएच बॅटरी आणि १८ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्टसह आहे. ह्या मोबाइलमध्ये ड्युअल सिम ४जी, वाय-फाय, ब्लूटूथ ३.५मिमी हेडफोन जॅक, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सारखे अनेक फीचर्स मिळत आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.