Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भुयारी मेट्रो अडली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणेनंतरही डेडलाइन चुकण्याची चिन्हे, कारण…

7

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पश्चिम उपनगरासह दक्षिण मुंबईतील गर्दीला नियंत्रणात आणू शकणाऱ्या मेट्रो ३ या भूमिगत मार्गिकेला कमालीचा विलंब झाला आहे. या मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबर, २०२३मध्ये सुरू होईल, अशी घोषणा स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, हा प्रकल्प डिसेंबरची ‘डेडलाइन’ चुकवणार, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.

मेट्रो ३ ही मार्गिका मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तर-दक्षिण जोडते. उत्तरेला आरे ते दक्षिणेला कफ परेडपर्यंत मार्गे बीकेसी, दादर, काळबादेबी, सीएसएमटी अशी ही २७ स्थानकांची मार्गिका आहे. मार्गिकेचा पहिला टप्पा आरे ते प्राप्तिकर कार्यालय (बीकेसी) असा दहा स्थानकांचा असेल. मात्र या पहिल्या टप्प्यालाच आता मोठा विलंब झाला आहे. ही मार्गिका केंद्र व राज्य सरकारची मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ही संयुक्त कंपनी उभी करीत आहे. एमएमआरसीने या संपूर्ण ३३ किमी लांबीच्या मार्गिकेसाठीचे भुयारीकरण गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यातच पूर्ण केले. वास्तवात या मार्गिकेदरम्यान उत्तर भागात औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्र, तर दक्षिण भागात महत्त्वाच्या हेरिटेज आणि जुन्या इमारती आहेत. तरीही सरासरी २५ ते ४० मीटर खोलीवर आव्हानात्मक स्थितीत हे भुयारीकरण वेळेत पूर्ण करण्यात आले. यानुसार पहिला टप्पा डिसेंबर, २०२३मध्ये सुरू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी केली. मात्र पुढील दहा दिवसांत तरी ही मार्गिका सुरू होण्याची चिन्हे नाहीत.

कॉलेजमधील तरुण-तरुणी दुचाकीवरून निघाले; अचानक टेम्पोची जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू
आरे येथे या मार्गिकेतील गाड्यांचा दुरुस्ती डेपो उभा राहात आहे. त्या कारशेडसाठी झाडांच्या अधिग्रहणाला आंदोलनाद्वारे झालेल्या विरोधामुळे आधीच प्रकल्पाला दोन वर्षांचा विलंब झाला असताना, आवश्यक ती सर्व झाडे तोडून त्याजागी कारशेड उभी करण्यासाठी आवश्यक जमीन एमएमआरसीला उशिराने मिळाली. परिणामी डिसेंबर, २०२३मध्ये मार्गिका सुरू करण्याचे उद्दिष्ट असूनही एप्रिलमध्ये या कारशेडची उभारणी फक्त २२ टक्केच झाली होती. सध्या ही कारशेड पूर्णपणे उभी नसणे हे विलंबाचे महत्त्वाचे कारण ठरले आहे. या मार्गिकेसाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येक आठ डब्यांच्या नऊ गाड्यांची गरज आहे. यातील नववी गाडी नोव्हेंबरअखेरीस विलंबाने मुंबईत दाखल झाली. गाडी दाखल झाल्यानंतर तिची कमाल वेगाने अंतिम चाचणी घेतली गेली. त्या चाचणी अहवालानुसार सुरक्षा प्रमाणपत्र घ्यावे लागते. मात्र अद्याप नवव्या गाडीची चाचणी झाली नसल्याने पुढील सर्वच प्रक्रिया रखडली आहे. हेदेखील विलंबाचे कारण ठरले आहे. यासंदर्भात एमएमआरसीशी संपर्क साधला असता, त्यांनी कुठल्याही प्रतिक्रियेस नकार दिला. त्यामुळेच विलंबाबाबतचा संशय आणखी बळावला आहे.

मेट्रो ३ मार्गिका

एकूण लांबी : ३३ किमी

स्थानके : २७

पहिला टप्पा : आरे ते बीकेसी

पहिल्या टप्प्यातील स्थानके : १० (आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार रोड, देशांतर्गत विमानतळ टर्मिनल, सांताक्रूझ, विद्यानगरी व बीकेसी)

गाड्या : आठ डब्यांच्या नऊ गाड्या

प्रकल्पाचे मूल्य : सुमारे ३३ हजार कोटी रु.

आमदार अपात्रता सुनावणीत शिंदे गटाचा युक्तिवाद म्हणजे नो बॉल, डेड बॉल, ठाकरे गटाचा युक्तिवाद

दररोज ४ लाख प्रवाशांची क्षमता

मेट्रो ३मधील प्रत्येक डब्याची क्षमता ३०० व गाडीची क्षमता २४०० ते २६०० प्रवासी इतकी असेल. ही मार्गिका पूर्ण रूपात (२७ स्थानके) सुरू झाल्यानंतर डिसेंबर, २०२५पर्यंत या मार्गिकेची दैनंदिन प्रवासीसंख्या १३ लाख इतकी असेल, असे प्रकल्पाच्या मूळ आराखड्यात नमूद आहे. त्यानुसार १० स्थानकांच्या पहिल्या टप्प्यात या नऊ गाड्यांच्या दररोज १६० फेऱ्या होण्याची शक्यता आहे. त्यातील दैनंदिन प्रवासीसंख्या चार लाखांच्या घरात असेल.

अजित पवारांवर बेधडक टीका, शरद पवारांचं कौतुक; नवी मुंबईत अमोल कोल्हेंचं दमदार भाषण

Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.