Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

POCO चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन येतोय भारतात; १५ डिसेंबरला होईल लाँच

3

POCO India नं एक अधिकृत एक्स पोस्टच्या माध्यमातून POCO C65 च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. POCO C65 गेल्या महिन्यात ग्लोबली लाँच करण्यात आला होता आणि ह्याचे स्पेसिफिकेशन आधीच समोर आले आहेत. POCO C65 भारतात १५ डिसेंबर, २०२३ दुपारी १२ वाजता लाँच होईल. हा फोन Redmi 13C 4G चा रीब्रँड आहे अशी चर्चा आहे, जो अलीकडेच भारतात आला आहे.

POCO C65 चा इंडिया लाँच कंफर्म

POCO इंडियाचे प्रमुख हिमांशु टंडन ह्यांनी टीजर इमेज शेयर केली, ज्यात सांगण्यात आलं आहे की POCO C65 १५ डिसेंबरला भारतात लाँच होईल. टीजर इमेज मध्ये Flipkart चा लोगो आहे, ज्यामुळे फोनच्या ऑनलाइन उपलब्धतेचा खुलासा झाला आहे.

पोस्टर इमेज मधून फोनची बॅक डिजाइन आणि एक नवीन पर्पल कलर ऑप्शन दाखवण्यात आला आहे. ह्यात ट्रिपल कॅमेरा सेन्सर आणि एलईडी फ्लॅशसह दोन मोठे वर्तुळाकार कॅमेरा युनिट दिसत आहेत. बॅक पॅनलवर POCO ब्रँडिंग आहे. इतकेच नव्हेत तर, बॅक पॅनलवर ’50MP AI Cam’ टेक्स्ट दिसत आहे तसेच डावीकडे सिम ट्रे दिसत आहे.

POCO C65 Price

POCO C65 चे दोन व्हेरिएंट जागतिक बाजारात आले आहेत. ह्यातील ६जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२९ डॉलर्स (जवळपास १०,८०० रुपये), तर ८जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४९ डॉलर्स (जवळपास १२,५०० रुपये) आहे. फोन पर्पल, ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये सादर करण्यात आला होता.

POCO C65 चे स्पेसिफिकेशन्स

POCO C65 मध्ये ६.७४-इंचाचा डिस्प्ले, वॉटरड्रॉप नॉच, ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट, ६०० निट्स पीक ब्राइटनेस आणि गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आहे. फोन मीडियाटेक हेलियो G८५ प्रोसेसर वर चालतो. सोबत ८जीबी पर्यंत रॅम व २५६ जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड १३ आधारित मीयुआय १४ वर चालतो.

POCO C65 मध्ये रियर पॅनलवर दोन कॅमेरा आहेत, ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाइसमध्ये १८वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी ४जी एलटीई, वायफाय, ब्लूटूथ, एनएफसी, एक ३.५ मिमी ऑडियो जॅक आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्टचा पर्याय मिळतो. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक असे सिक्योरिटी ऑप्शन मिळतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.