Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

खास बजेट युजर्ससाठी येतोय POCO M6 5G, अत्यंत कमी किंमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स

5

सध्या POCO तीन फोन्सवर काम करत आहे. लीकनुसार, ह्या फोन्समध्ये POCO X6, POCO X6 Pro आणि POCO M6 चा समावेश आहेत. लवकरच हे फोन्स जागतिक बाजारात सादर केले जाण्याची शक्यता आहे. तसेच हे स्मार्टफोन भारतात देखील लाँच केले जाऊ शकतात. टिप्सटर Kacper Skrzypek नं X वर दावा केला आहे की आगामी POCO M6 स्मार्टफोन Redmi 13C चा रीब्रँड असेल, जो अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला आहे.

POCO M6 असेल Redmi 13C चा रीब्रँड!

टिपस्टर Kacper Skrzypek नं आगामी POCO स्मार्टफोनच्या सोर्स कोडचा स्क्रीनशॉट शेयर केला आहे. इमेजमध्ये फोनचे मार्केटिंग नेम POCO M6 5G असल्याचं दिसत आहे. स्क्रीनशॉट मॉडेल नंबर 23128PC33I आणि इंटरनल नेम “air_p” सह POCO-ब्रँडेड हँडसेटकडे इशारा करतो. मॉडेल नंबरच्या शेवटी असलेला ‘I’ भारतीय व्हर्जनकडे इशारा करतो. विशेष म्हणजे हा आधीच लाँच झालेल्या फोनचा रीब्रँड असल्यामुळे स्पेसिफिकेशन काय असतील, ते समजले आहेत.

Redmi 13C 5G चे स्पेसिफिकेशन्स

Redmi 13C 5G मध्ये ६.७४-इंचाचा एचडी+ डिस्प्ले, ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट, २६०पीपीआय पिक्सल डेंसिटी, १६०० × ७२० पिक्सल रिजॉल्यूशन, १८० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शन आणि ६००नीट्स पीक ब्राइटनेस आहे. फोन अँड्रॉइड १३-आधारित मीयुआय१४ वर चालतो.

Redmi 13C 5G मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६१००+ प्रोसेसर मिळतो, सोबत माली-जी५७ एमसी२ जीपीयू देण्यात आला आहे. सोबत ८जीबी पर्यंत एलपीडीडीआर४ रॅम आणि २५६जीबी यूएफएस २.२ स्टोरेज, जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. फोन अँड्रॉइड १३-आधारित मीयुआय१४ वर चालतो.

Redmi 13C 5G मध्ये ५० मेगापिक्सलसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी ५जी/४जी, ड्युअल-सिम, वायफाय ८०२.११, ब्लूटूथ ५.३, ३.५ मिमी ऑडियो जॅक आणि जीपीएस आहे. ह्यात १८W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,०००एमएएचची बॅटरी आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.