Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुन्हा एकदा महागडे फीचर्स स्वस्तात देण्यासाठी OnePlus तयार; फक्त ६ दिवसांनी लाँच होईल Ace 3

6

OnePlus नं काही दिवसांपूर्वी आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 12 चीनमध्ये लाँच केला होता. आता OnePlus Ace 3 देखील लवकरच चीनमध्ये लाँच केला जाईल, जो भारतासह जागतिक बाजारात येताना OnePlus 12R म्हणून रीब्रँड केला जाईल. विशेष म्हणजे हा कंपनीच्या फ्लॅगशिप सीरिजमधील सर्वात स्वस्त हँडसेट असेल परंतु ह्याचे बहुतांश स्पेसिफिकेशन्स सर्वात कंपनीच्या शक्तिशाली मॉडेल सारखे असू शकतात. आता टिपस्टर DigitalChatStation नं ह्या फोनच्या डिस्प्ले स्पेसिफिकेशनची माहिती दिली आहे. त्यानुसार स्मार्टफोनचा डिस्प्ले वनप्लस १२ सारखा असेल फक्त आकार वेगळा असेल.

OnePlus Ace 3 चा डिस्प्ले

टिपस्टरनुसार, OnePlus Ace 3 मध्ये १.५के रिजॉल्यूशन आणि कर्व्ह एजसह ६.७८-इंचाचा BOE X1 डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. लीकनुसार, फोनमध्ये वनप्लस १२ सारखीच पीक ब्राइटनेस आणि पीडब्लूएम डिमिंग असेल. विशेष म्हणजे वनप्लस १२ मध्ये ६.८२ इंचाचा क्वॉड-एचडी+ एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले आहे, ज्याचे रिजॉल्यूशन १,४४० x ३,१६८ पिक्सल, ४,५०० निट्स ब्राइटनेस आणि २१६०हर्ट्झ पीडब्लूएम डिमिंग रेट आहे.

डिजटल चॅट स्टेशननुसार, OnePlus Ace 3 स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट, १०० वॉट फास्ट चार्जिंग, ५५००mAh बॅटरी आणि फुल-मेटल फ्रेम सह येऊ शकतो, जे वनप्लस १२ मध्ये देखील आहेत. एक्स वर आलेल्या एका एक चीनी रिटेलर वेबसाइटच्या स्क्रीनशॉटनुसार, वनप्लस एस ३ चीनमध्ये १७ डिसेंबर, २०२३ ला लाँच केला जाईल.

OnePlus Ace 3 चे संभाव्य स्पेसिफिकेशन

वनप्लस एस ३ मध्ये ६.७४-इंच १.५के ओएलईडी डिस्प्ले, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि पीडब्लूएम डिमिंग सपोर्ट असण्याची शक्यता आहे. सेल्फीसाठी पंच-होल कटआउट असू शकतो. फोनमध्ये १००वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,५०० एमएएचची बॅटरी असण्याची शक्यता आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर,आयपी६८ रेटिंग आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस.

स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स८९० सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड ओमनीव्हिजन ओव्ही८डी१० सेन्सर आणि ३२ मेगापिक्सलची सोनी आयएमएक्स७०९ टेलीफोटो लेन्स असण्याची शक्यता आहे. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो.

OnePlus Ace 3 मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट असण्याची शक्यता आहे. सोबत २४जीबी पर्यंत एलपीडीडीआर५एक्स रॅम आणि १टीबी यूएफएस ४.० स्टोरेज असण्याची शक्यता आहे. फोन अँड्रॉइड १४ आधारित कलरओएस १४ कस्टम स्किनवर चालू शकतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.