Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Aries Horoscope 2024 : लाभासहीत आकस्मिक खर्चाचा योग

8
Aries Yearly Horoscope 2024: मेष राशीच्या संक्रमण फलाचे अध्ययन केल्यानंतर एक गोष्ट जाणवते की २०२४ हे वर्ष मागील वर्षापेक्षा चांगले असेल. ग्रह संक्रमणाची स्थीती सांगते की, यावर्षी शनी तुमच्या राशीच्या ११ व्या स्थानी संंक्रमण करतील ज्यामुळे तुम्हाला करीयर आणि कमाईच्या बाबतीत मोठा लाभ मिळणार आहे. खोळंबलेली कामे यावर्षी व्यवस्थित पूर्ण होणार आहेत. मे २०२४ पासून गुरू तुमच्या राशीतील द्वितीय स्थानी संक्रमण करेल जे मागील वर्षापेक्षा लाभदायक परिणाम देईल. यावर्षी राहू आणि केतू तुमच्या राशीपासून अनुक्रमे १२ व्या आणि ६ व्या स्थानी गोचर करत असल्याने तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच ते तुमच्यावर आर्थिक बाबतीत सुध्दा प्रभाव टाकणारे असेल. अचानक खर्च होण्याचा योग यावर्षी बनतो आहे.. घरात एखाद्या कार्याचे आयोजन होईल.

मेष राशी आर्थिक राशीभविष्य: नोकरी, व्यवसाय व उपजीवीकेच्या दृष्टीने हे वर्ष सामान्यतः चांगले राहील. तुमच्या कमाईत वाढ होईल व नोकरीत प्रमोशन तसेच चांगले इन्क्रीमेंट मिळेल. जूननंतर नोकरीत बदल संभवतो. व्यवसायाच्या बाबतीत वर्ष सामान्य राहील. मेष राशीच्या व्यावसायिकांसाठी वर्षाचे शेवटचे तीन महिने विशेषतः फलदायी असतील. यावर्षी आकस्मिक खर्चाचे योग बनतील. एप्रिल ते जून तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये खर्चात वाढ होईल.

मेष राशीचे २०२४ साठी प्रेम आणि कुटुंबविषयक राशीभविष्य
घर परिवाराच्या बाबतीत हे वर्ष आपणास शुभ संकेत देत आहे. विवाह योग्य व्यक्ती यावर्षी गृहस्थ जीवनास प्रवेश करतील. पिता आणि पैतृक पक्षाकडून तुम्हाला लाभ होईल. घरी मांगलिक कार्याचे आयोजन केले जाईल. मे २०२४ पासून लवलाइफ आणि कौटुंबिक जीवनात सुख आणि समाधान मिळेल. संतती सुखासाठी जे लोक प्रयत्नशील आहेत त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील.

मेष राशीचे २०२४ साठी आरोग्य विषयक राशीभविष्य
आरोग्यासंबंधी ग्रह तारे प्रतिकूल परिस्थिती दर्शवीत आहेत. यावर्षी राहू तुमच्या राशीपासून १२ व्या स्थानी असल्याने तुम्हाला आणि कुटुंबातील सदस्यांना आजाराचा सामना करावा लागणार आहे.उपचारासाठी होणारा खर्च वाढेल तसेच मानसिक ताण ही वाढेल. एखादा जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने गंभीरपणे विचार करायला हवा तसेच काळजी घ्यायला हवी. उपचाराच्या बाबतीत अजिबात हयगय करू नये.

मेष राशीसाठी २०२४ मधील उपाययोजना
मेष राशीच्या व्यक्तींनी यावर्षी आठ किंवा नऊ मुखी रुद्राक्ष धारण करावे. रत्न धारण करायचे असल्यास पुखराज किंवा टोपाज धारण करावे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.