Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अवैधपणे वाळुची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध रामटेक पोलिसांची कारवाई,वाहनासह एकुण १५,३०,००० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त….
रामटेक(नागपुर ग्रामीण)- सवीस्तर व्रुत्त असे की,दि. २०/१२/२०२३ रोजी पोलिस स्टेशन रामटेक येथील पथक पोलिस स्टेशन रामटेक हद्दीत पेट्रोलींग करीत असताना अवैधरित्या विनापरवाना वाळुची वाहतुक होत असल्याची मुखबीरद्वारे मिळालेल्या माहितीवरून
एका ट्रकमध्ये विनापरवाना वाळुची वाहतुक होत आहे असे सांगितल्यावरून पोलिस स्टेशन रामटेक येथील पथकाने
रामटेक बसस्थानकाजवळ हायवे रोडजवळ नाकाबंदी केली असता दि. २०/१२/२०२३ ०१.४० वाजता दरम्यान एक ट्रक येतांना दिसला ट्रकला हात दाखवुन थांबण्याचा इशारा केला असता ट्रकच्या चालकाने ट्रक रोडच्या बाजुला थांबविला. सदर ट्रकची पाहणी केली असता ट्रकचा क्रमांक एम. एच. ४० सी. एम. ५७०० व १६ चाके असल्याचे दिसला. चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव इम्रान नाशिर खान वय ३२ वर्षे रा. नुर नगर गली नं. २, वलगाव रोड, अमरावती असे सांगितले. त्यास वाहनाच्या मागील डाल्यात काय आहे? असे विचारले असता त्याने रेती (वाळु) असल्याचे सांगितले, त्यास वाळुच्या वाहतुकीबाबत परवाना विचारला असता त्याने परवाना नाही असे सांगितले. सदर ट्रक क्रमांक एम. एच. ४० / सी. एम. ५७०० किंमती १५,००,०००/- रू. व अंदाजे १० ब्रास वाळु ३०००/- रू. प्रती ब्रास प्रमाणे ३०,००० / – रू. असा एकण- १५,३०,००० /- रु. चा मुद्देमाल अवैधरित्या वाहतुक करतांना चालकाच्या ताब्यात मिळून आले. सदर वाळुबाबत इम्रान नाशिर खान यास विचारपुस केली असता वाहन मालक युनुस इलियास खान, रा. यास्मीन नगर अमरावती यांचे सांगण्यावरून वाळुची चोरटी वाहतुक करीत असल्याचे सांगितले. सदर वाळु ही बपेरा, बालाघाट (मध्यप्रदेश) येथून भरली असून रामटेक- नागपुर मार्ग अमरावती येथे अवैधरीत्या विनापरवाना घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी – पोलीस नायक प्रफुल मुरलीधर रंघई, पोलिस ठाणे रामटेक यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. रामटेक येथे सदर ट्रकचा चालक १) इम्रान नसीर खान, राहणार अमरावती यांचे विरूद्ध कलम ३७९ भा. दं. वि. १८६० सहकलम ४८ (८) महा. जमीन महसूल संहीता १९६६ अन्वये गुन्हा दाखल असुन ट्रक मालक आरोपी क्र. ०२) यांचेविरूद्ध कलम १०९ भादंवि अन्वये कलमवाढ करण्यात आली आहे.
सदर कारवाई हर्ष ए. पोद्दार पोलिस अधिक्षक नागपूर ग्रामीण, डॉ. संदिप पखाले अपर पोलिस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव, पोलिस उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के, पोलिस नायक प्रफुल रंधई, योगेश भुरे, पो. शि. नितेश डोकरीमारे, शरद गिते यांच्यासह पार पाडली.