Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विना नंबरची गाडी दिसली, पोलिसांना संशय अन् बिंग फुटलं, दोघांना अटक, पुढं जे घडलं ते….

9

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून,११ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पंचवटी पोलिसांनी हस्तगत केला आहे. संशयितांनी नाशिक शहरातील पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली आणि नाशिक ग्रामीण मधील दिंडोरी व वणी पोलीस ठाणे या हद्दीतील तब्बल १७ मोटरसायकल चोरी केल्या होत्या.

पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना पोलीस ठाणे हद्दीत मेरी शासकीय ऑफिस गेट समोर दोन व्यक्ती संशयितरित्या विना नंबर मोटर सायकल घेऊन फिरताना आढळून आले. पोलिसांनी या दोघांना थांबण्याची विनंती केली असता, ते पळून जाऊ लागले त्यानंतर पोलिसांनी शिताफिने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

यश मांडवडे (रा. चवगाव, ता. बागलाण) आणि प्रशांत गावित (रा. बाबापूर, ता. दिंडोरी) या दोघांना अटक करण्यात आलंय. या दोन्ही संशयितांनी नाशिक शहरातील पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली आणि नाशिक ग्रामीण मधील दिंडोरी आणि वणी पोलीस ठाणे या हद्दीतील तब्बल १७ मोटरसायकल चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या कारवाईत एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं आहे.
शाळेची सहल कोकणातून परतताना अनर्थ, माळशिरसमध्ये बसचा अपघात, विद्यार्थ्यांच्या डोळ्यांदेखत लाडके काळे सर हरपले
नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांकडून दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. पंचवटी पोलिसांनी केलेल्या कारवाईत ११ लाखांच्या तब्बल १७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
नात आजीला हाक मारत आली, दुकानाचं शटर उघडं होतं, जे पाहिलं ते धक्कादायक, साताऱ्यात मायलेकीचा खून, तपास सुरु

नाशिकमधील दुचाकी चोरट्यांना चाप बसणार

नाशिक पोलिसांनी कारवाई करत दोन दुचाकी चोरांना अटक केली आहे. पोलिसांनी एका संशयावरुन दोघांच्या मुसक्या आवळल्यानं चोरट्यांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळं नाशिक शहरातील दुचाकी चोरीच्या घटना कमी होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे जांच्या गाड्या चोरीला गेल्या होत्या त्यांना त्या परत मिळू शकतील.
तुम्ही पत्रकार आहात का? बेरोजगार तरुणाच्या प्रश्नाला उत्तर देण्यास चंद्रकांतदादांचा नकार

७२ हजार रुपये आणि सोन्यासह बॅग परत मिळली; हॉटेल चालकाचा प्रामाणिकपणा, पोलिसांकडून गौरव

Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.