Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
परतवाडा(अमरावती ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती ग्रामीण जिल्हयात अवैध धंद्यावर पुर्णपणे आळा बसाण्याकरीता विशाल आंनद, पोलिस अधिक्षक यांनी आपले अधिनस्त सर्व प्रभारी अधिकारी यांना मार्गदर्शन करुन कारवाई करण्याच्या सुचना निर्गमीत केल्या होत्या,त्याअनुषंगाने
पोलिस स्टेशन परतवाडा दिनांक २०/१२/२०२३ रोजी गस्तीवर असतांना गुप्त बातमी मिळाली कि, अष्टमासिध्दी ते कविठा रोड वर चारचाकी वाहन टाटा इंडीगो मांझा क्रं. एम.एच.२९ आर ५४५४
ने काही ईसम संशयास्पदरित्या फिरत आहेत. प्राप्त माहीतीच्या आधारे नमुद ठिकाणी नाकाबंदी करुन सदरचे वाहन थांबवुन वाहनातील ईसम यांची विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे नावे
१) आश्लेश गजानन साठे वय २६ रा. अचलपुर
२) अन्सार खान महेबुब खान वय ३३ रा परतवाडा
३) शेख साहील शेख चांद वय २१ रा बैतुल (म.प्र)
अशी सांगितली. सदर ईसमाच्या ताब्यातील चारचाकी वाहनाची
तपासणी कली असता वाहनाचे डिक्कीत ३ किलो ११० ग्रॅम अंमली पदार्थ गांजा मिळुन आला. त्यावरुन त्यांचे कडुन गांजा, वाहन, चार मोबाईल असा एकुण ४,४२,५००/- रु चा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीतांविरुध्द पोलिस स्टेशन परतवाडा येथे अंमली पदार्थ कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास परतवाडा पोलिस करीत आहेत.
सदरची कामगिरी विशाल आनंद ,पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रा.,
विक्रम साळी ,अपर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा., उपविभागीय पोलिस अधिकारी अतुलकुमार नवगिरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप चव्हान ठाणेदार पोलिस स्टेशन परतवाडा,
पोलिस उपनिरीक्षक .विठठल वाणी, पोहवा सुधीर राउत, उमेश सावरकर, गोपाल झटाले, मनिष काटोलकर, शफीक शेख, विवेक ठाकरे, अनुप फुसे, जितेश बाबिल, घनश्याम किरोल यांचे पथकाने
केली आहे.