Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

देशात कोरोनाचे कमबॅक, यंत्रणा अलर्ट मोडवर, आरोग्य विभागाच्या हालचाली सुरू

11

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: तब्बल दीड वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर करोनाने देशात कमबॅक केले असून, केरळमध्ये पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून, केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांनंतर नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी आरोग्य-वैद्यकीय विभागाची तातडीची बैठक घेत सजग राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय विभागाने नाशिकरोड येथील स्व. बाळासाहेब ठाकरे (नूतन बिटको) रुग्णालय तसेच जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन (कथडा) रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्याची तयारी केली आहे. तुर्तास नाशिकमध्ये अद्याप करोनाचा एकही रुग्ण नसल्याचे वैद्यकीय विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत शहरात करोनाने थैमान घातले होते. चार लाखांहून अधिक जणांना करोनाची लागण झाली होती, तर चार हजारांहून अधिक रुग्णांचा यात बळी गेला होता. २०२२ मध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नाशिककरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु, पुन्हा एकदा केरळ राज्यात करोनाचा नवीन व्हेरियंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय व कुटुंब कल्याण मंत्रालय, तसेच राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला असून, महापालिकेला यासंदर्भातील दक्षतेच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार आयुक्त डॉ. करंजकर यांनी आरोग्य वैद्यकीय विभागाची तातडीची बैठक घेत, करोना संकटाचा सामना करण्यासाठी करोनासाठी राखीव बेड, ऑक्सिजन व्यवस्था तसेच औषधसाठ्याचा आढावा घेत सर्व सज्जतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. सर्दी, ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे यांसारखी लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तूर्त बिटको रुग्णालय अर्थात स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात तसेच झाकीर हुसेन रुग्णालयात विशेष कक्ष सज्ज ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.

नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

करोनाचा रुग्ण नाही

केरळ राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळून आला असला, तरी अद्याप नाशिकमध्ये करोनाची लागण झालेली नाही. करोनाचा एकही रुग्ण महापालिका हद्दीत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. करोना नियमांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसा खवखवणे यांसारखी लक्षणे आढळल्यास संबंधितांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क परिधान करावा. सामाजिक अंतर पाळावे. करोनाची लक्षणे आढळल्यास संबंधित रुग्णाने गर्दीत जाणे टाळावे, कुटुंबातील अन्य सदस्यांसमवेतही सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करावे. – डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, मनपा

दगडी फुटपाथ अन् मोठे स्लॅब; पाण्याखाली सापडलं ३७५ वर्ष जुनं रहस्यमय शहर, अखेर गूढ उकललं
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.