Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एनटीआरओमध्ये शास्त्रज्ञ पदांसाठी भरती; एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना मोफत अर्ज करायची सवलत

7

NTRO Bharti 2023-24 : एनटीआरओ म्हणजेच, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनने वैज्ञानिक ‘बी’ (Scientist B) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. NTRO ने जाहीर केल्याप्रमाणे पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट recruitment-ndl.nielit.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवार १९ जानेवारी २०२४ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

पदभरतीचा तपशील :

सायंटिस्ट ‘बी’ : ७४ जागा

पदनिहाय जागांचा तपशील :

इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन : ३५ जागा
कम्प्युटर सायन्स : ३३ जागा
जिओ-इन्फोमॅटिक्स अँड रिमोट सेन्सिंग : ०६ जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.
शिवाय, संबंधित विषयातील वैध GATE स्कोअर कार्ड असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा :

ऑनलाइन अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवारांचे कमाल वय ३० वर्षे असावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

मिळणार एवढा पगार:

एनटीआरओ मधील जागांवर निवड होणार्‍या उमेदवारांना प्रति महिना ५६,१०० ते १, ७७,५०० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.

अर्ज शुल्काविषयी :

सामान्य : २५० रुपये
SC, ST, महिला उमेदवार : कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

अशी असणार निवड प्रक्रिया :

उमेदवारांना संबंधित विषय / क्षेत्रातील वैध GATE स्कोअरच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल.
त्यानंतर लेखी परीक्षा आणि मुलाखत होईल.

एनटीआरओमधील भरतीसाठी असा करा अर्ज :

  • NTRO सायंटिस्ट बी भरतीच्या अर्जासाठी रिक्रूट्मेंट लिंकच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.undefinedundefined
  • नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन ऑनलाइन फॉर्म लिंकवर क्लिक करा.
  • सर्व तपशील भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • पुढील गरजांसाठी फॉर्मची प्रिंट आउट घ्या.

महत्त्वाच्या लिंक्स :

एनटीआरओच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

एनटीआरओ भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.