Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
करोनाच्या साथीची दुसरी लाट ओसरत असताना, लोकलमधील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी टप्प्याप्प्प्याने लोकलमुभा देण्यात येणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना, तर त्यानंतर दुसऱ्या टप्यात करोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या प्रवाशांना म्हणजेच लसधारकांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली.
वाचा:शिवसेनेनंतर आता भाजपचाही शुद्धीकरण विधी; पाहा, नेमकं काय घडलं?
लसधारकांना लोकलमुभा देण्याची घोषणा झाल्यानंतर, ११ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या काळात मध्य रेल्वेवर रोज सरासरी १८ हजार यानुसार एकूण दोन लाख ७४ हजार ९८१ मासिक पासची विक्री झाली, तर पश्चिम रेल्वेवर दररोज सात हजारच्या सरासरीने एक लाख ११ हजार ६०७ पासची विक्री झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलसाठी एक हजार ९०७ तिकिटे आणि एक हजार ४९३ पासची विक्री झाली. वातानुकूलित लोकलचे भाडे जास्त असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. यामुळे अद्याप वातानुकूलित लोकलला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. सर्वांसाठी लोकल सुरू झाल्यानंतर या लोकलला चांगला प्रतिसाद लाभेल, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
पासविक्री…… (११ ते २६ ऑगस्ट)
मध्य रेल्वे……. २.७४ लाख
पश्चिम रेल्वे……. १.११ लाख
एकूण……. ३.८६ लाख
वाचा: अमिताभ यांच्या पोलीस बॉडीगार्डची तडकाफडकी बदली; ‘हे’ आहे कारण
नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांसाठी कडक नियमांचा जाच आणि राजकीय पुढाऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना सूट असा प्रकार सध्या सुरू आहे. पंधरा दिवसांनंतर गर्दी नियंत्रणात असल्यास सामान्यांना लोकलमुभा देण्याचा विचार करण्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. मुंबईसह राज्यभरात यात्रा, मोर्चे आंदोलने तेजीत आहे. त्यामुळे आता सामान्य मुंबईकरांचा प्रवास जाच कमी करण्यासाठी करोना प्रतिबंधक लशीची एक मात्रा घेतलेल्या नागरिकांनाही लोकलमुभा द्यावी.
– सुभाष गुप्ता, प्रवासी संघ