Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

टँकरफेऱ्या शंभरावर; १५४ गावे अन् २८६ वाड्यांवर पाणीटंचाई, २ लाखांवर नागरिकांना पिण्यासाठी टॅंकरचे पाणी

7

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होऊ लागल्या असून, ऐन हिवाळ्यातच टँकरवाऱ्या सुरू असल्याचे चित्र सध्या विभागात दिसून येत आहे. विभागात सध्या शासकीय यंत्रणेकडून ४४० गावे व वाड्यांवरील २ लाख ४ हजार २६० नागरिकांना १२७ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यापैकी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात सर्वात जास्त १९९ गावे व वाड्यांना ३५ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे.

– नाशिक विभागात पावसाळ्यात एका महिन्याचा ‘ड्राय स्पेल’ गेल्याने आणि नंतरच्या काळातही सरासरी इतका पाऊस न झाल्याने भूजलपातळी घटून ५४ पैकी १० तालुक्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

– पाणीटंचाईचा सामना करावा लागत असलेल्या तालुक्यांत नाशिक जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, सिन्नर, येवला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि नगर जिल्ह्यातील संगमनेर, पाथर्डी या १० तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.

– आजमितीस विभागात १६ शासकीय आणि १११ खासगी टँकरद्वारे १५४ गावे आणि २८६ वाड्यांवरील २ लाख ४ हजार २६० नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार ६१० नागरिकांचा समावेश आहे.

– संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाकडून ४८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. येत्या काही महिन्यांत पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
नाशिककरांनो, तुम्ही पित असलेलं पाणी शुध्द आहे का? जिल्ह्यात ‘या’ गावांचे पाणी दूषित, वाचा लिस्ट
खासगी टँकर लॉबीला ‘अच्छे दिन’

पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असले तरी या प्रतिकूल परिस्थितीत खासगी टँकर लॉबीला मात्र ‘अच्छे दिन’ येत असल्याचे चित्र आहे. सध्या पाणीटंचाईचा आलेख जसजसा वाढू लागला आहे तसतसा खासगी टँकर लॉबीला ‘छप्पर फाडके’ लाभ होऊ लागला आहे. सध्या विभागात सुरू असलेल्या १२७ टँकरपैकी तब्बल १११ टँकर खासगी तर शासकीय टँकरची संख्या अवघी १६ इतकी आहे. यावरून खासगी टँकर लॉबीला ‘अच्छे दिन’ आल्याची बाब स्पष्ट होत आहे.

टँकरने पुरवठा सुरू असलेले तालुकानिहाय गावे-वाडे
तालुका—गावे—टँकर—लोकसंख्या
नांदगाव—१९९—३५—४५,०१९
येवला—६०—२३—४७,२२९
पाथर्डी—५६—८—१८,५४९
चांदवड—२८—१०—२२,९४५
मालेगाव—२७—१५—२१,५८६
देवळा—२३—८—८,९४०
बागलाण—२२—६—७,१४०
चाळीसगाव—१२—१३—२५,००६
सिन्नर—९—९—६,७५१
संगमनेर—४—१—१,०९५
एकूण—४४०—१२७—२,०४,२६०

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.