Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- धुळ्यातील साक्री येथे एसटी बस चालकाची आत्महत्या
- आर्थिक अडचणींना कंटाळून उचललं टोकाचं पाऊल
- आत्महत्येसाठी एसटी महामंडळाला धरलं जबाबदार
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही. यामुळं मंडळाचे अनेक कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बेडसे यांच्यावरही हीच परिस्थिती ओढवली होती. त्यांचा मुलगा नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता. त्याचं पुढील शिक्षण कसं करायचा हा प्रश्नही त्यांच्यासमोर होता. त्यामुळं ते खचले होते. त्यातूनच शुक्रवारी सायंकाळी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
वाचा: नाशिकमध्ये भाजपला धक्का; माजी उपमहापौर शिवसेनेच्या वाटेवर
बेडसे यांनी आत्महत्या केली, त्यावेळी त्यांची पत्नी व मुलगा हे दोघेही बाहेरगावी गेले होते. ते घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तात्काळ परिसरातील नागरिकांनी साक्री पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेमुळं संतापलेल्या बेडसे यांच्या नातेवाईकांनी व सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी साक्री एसटी आगार काही काळ बंद ठेवत सुरत-नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आत्महत्येसाठी एसटी महामंडळास जबाबदार धरत बेडसे यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत एसटी महामंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जात नाही; तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला. विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन नातेवाईकांची समजूत काढली. या प्रकरणी चौकशीसाठी परिवहन मंत्र्यांना निवेदन देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिल्यानंतर चार तासानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
वाचा: राजू शेट्टींची भाजपशी सलगी आणि आघाडीवर टीका; जयंत पाटील म्हणाले…