Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी जय्यत तयारी; आठ हजार पोलिस, हजार बसेस

11

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी सुमारे वीस लाखांहून अधिक अनुयायी येणार असल्याने त्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर आणि एक जानेवारीला सुमारे एक हजार बसेस, ११० एकरवर वाहन तळ आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे आठ हजार पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

यावेळी पोलीस सहआयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, पीएमपीचे महाव्यवस्थापक संजय कोलते, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी संजय आसवले विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘जिल्हा प्रशासन गेल्या तीन महिन्यांपासून अभिवादन सोहळ्याच्या तयारीसाठी नियोजन करत आहे. सार्वजनिक बांधकाम, पोलिस तसेच जिल्हा परिषदेचे सहकार्य घेण्यात येत आहे. यंदा अनुयायांची संख्या १५ ते २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

पीएमपीच्या एक हजार बसेस

पीएमपीकडून ३१ डिसेंबर आणि एक जानेवारी रोजी सुमारे एक हजार ५० गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार ३१ डिसेंबरला ४७५ बस दोन शिफ्टमध्ये चालवल्या जातील. तर एक जानेवारीला ५७५ बस दोन्ही बाजूने चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांसाठी शिक्रापूर येथे पार्किंगच्या ठिकाणी ३१ डिसेंबरला तेराशे वाहक तर एक जानेवारीला सुमारे दीड हजार वाहक, चालक तैनात असतील. पेरणे येथे पार्किंगला ३१ डिसेंबरला ११०० तसेच एक जानेवारीला १३०० वाहक- चालक दोन शिफ्टमध्ये काम करतील. या सोहळ्यासाठी एनडीआरएफचे एक पथकही नेमण्यात आले आहे. तसेच जिल्हा व शहर पोलिसांचे सुमारे आठ हजार कर्मचारी व अधिकारी या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली.

११० एकरवर पार्किंग

अनुयायी मोठया प्रमाणावर येणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. गेल्या वर्षी सुमारे १६ लाख अनुयायी आले होते. त्यानुसार ६० एकरवर १७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. यंदा वीस लाख अनुयायी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यामुळे सुमारे ४० एकरने पार्किंग क्षेत्रात वाढ करून दोन्ही बाजूला ११० एकरवर ३४ वाहनतळ उभारले जाणार आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सुविधा कोणत्या मिळणार?
– यंदा पाण्याचे टँकर वाढवण्यात आले असून ही संख्या दीडशेने वाढली आहे.
– या ठिकाणी सुमारे दोन हजार शौचालये उभारण्यात आले असून सक्शन मशिन ठेवण्यात येणार आहेत.
– वैद्यकीय विभागाचे सुमारे २५९ अधिकारी व कर्मचारी दोन्ही दिवशी वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहेत.
– आपत्कालीन परिस्थितीत १०८ क्रमांकाच्या २० तर अन्य ३० अशा एकूण ५० रुग्णवाहिका या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.