Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- शिवसेनेचे खासदार संजय राऊत नाशिकमध्ये
- नाशिकमधील शिवसैनिकांचे केले अभिनंदन
- केंद्रीय मंत्री राणेंवर पुन्हा एकदा घणाघाती टीका
ते नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. राऊत यांनी राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या हेतूवरच शंका उपस्थित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे व लोकांचा आशीर्वाद घेण्याच्या सूचना मंत्र्यांना दिल्या होत्या. ३६ मंत्र्यांनी त्यांचे आदेश पाळले. महाराष्ट्रात भारती पवार, भागवत कराड, कपिल पाटील यांनीही यात्रा काढल्या. शहाण्याप्रमाणे यात्रा काढल्या. पण एक अतिशहाणा निघाला. सरकारचा प्रचार करण्याऐवजी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडी सरकार व संजय राऊत यांच्याबद्दल बोलू लागले. शेवटी व्हायचं तेच झालं. वारंवार जीभ घसरल्यानं एकदा लगाम घालणं गरजेचं होतं. ते आम्ही कायद्यानं केलं,’ असं राऊत म्हणाले.
वाचा: नाशिकमध्ये भाजपला धक्का; माजी उपमहापौर शिवसेनेच्या वाटेवर
‘शिवसेनेतून अनेक जण गेले, पण ह्यांच्यासारखा उतमात कोणी केला नाही. आमच्या कुंडल्या काढण्याची भाषा करत आहेत. तुमच्या कुंडल्या नाहीत का? तुमचे संदूक बाहेर काढले तर काय बाहेर पडेल लक्षात ठेवा,’ असा इशाराही राऊत यांनी राणेंना दिला.
‘उद्धव ठाकरे यांचं नाव देशातील पाच चांगल्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहेत. त्यात भाजपचा एकही मंत्री नाही. भाजपनं यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. राणेंना प्रवेश दिल्यापासून भाजप प्रत्येकी दिवशी १० फूट मागे जातोय. राणेंचा आजचा पक्ष माहीत आहे, पण उद्याचा नाही. जे रामायण, महाभारतात झाले तेच होणार. अहंकाराचा नाश होणार,’ असं राऊत म्हणाले.
आम्ही आतापर्यंत अनेकांना खांदे दिलेत!
‘भाजप राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर वार करतोय. पण आमच्याकडंही बरेच खांदे आहेत. आम्ही आतापर्यंत अनेकांना खांदे दिलेत. खांदेच नव्हे, बंदूका उचलणारे हातही आमच्याकडं आहेत,’ असं राऊत म्हणाले. ‘खांदा दिला’ या शब्दावरून वाद होऊ नये म्हणून मला राजकीय खांदा म्हणायचं आहे, असा खुलासाही राऊत यांनी यावेळी केला.
वाचा:वेळेवर पगार नाही… एसटी महामंडळाला जबाबदार धरत कर्मचाऱ्याची आत्महत्या