Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ज्येष्ठ लेखक, संपादक आनंद अंतरकर यांचं निधन

11

पुणे: ‘हंस’, ‘मोहिनी’ व ‘नवल’ या दिवाळी अंकांचे संपादक व लेखक आनंद अंतरकर यांचं आज दुपारी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. सुमारे महिन्यापूर्वी त्यांच्यावर पोटाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली व आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. (Veteran Author Anand Antarkar Passes Away)

रुग्णशय्येवर असताहीनाही ते दिवाळी अंकांची कामे निष्ठेने आणि जिद्दीने करत होते. हॉस्पिटलमधे जाण्यापूर्वीच आनंद अंतरकरांनी यंदाच्या दिवाळी अंकांचे काम बऱ्याच प्रमाणात पूर्ण केले होते. त्यांच्या पश्चात् त्यांची पत्नी प्रियदर्शिनी (कै. ग दि . माडगूळकर यांची कन्या ), पुत्र अभिराम, कन्या मानसी आणि जावई सुप्रसिद्ध अभिनेते पंकज विष्णू आहेत. सुप्रसिद्ध सिनेपत्रकार अरुणा अंतरकर, लेखिका अनुराधा औरंगाबादकर आणि चित्रपटकार हेमलता अंतरकर ह्या त्यांच्या भगिनी होत.

वाचा: शिवाजी महाराजांबद्दल राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानावरून वाद, अमोल कोल्हे म्हणाले…

७५ वर्षांच्या परंपरेनुसार तिन्ही नियतकालिकांचे ह्या वर्षीचे दिवाळी अंकसुद्धा वाचकांपर्यंत पोचणार आहेत, अशी ग्वाही अभिराम अंतरकर ह्यांनी दिली. अंतरकर यांच्या निधनामुळं उत्तम सजावट, अनुभवी व नवोदित लेखकांच्या कसदार साहित्याने नटलेल्या मुद्रित मराठी नियतकालिकांचे एक अनोखे पर्व संपुष्टात आल्याची भावना व्यक्त होत आहे.

वाचा: पुणे हादरले! जनता वसाहत परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्कार

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.