Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.२३ :- मुंबई येथे खून करुन मृतदेह पुणे मुळशी परिसरात टाकणारे चार आरोपींना पुणे शहर पोलिसांनी जेरबंद करुन पौड पोलीस स्टेशनकडील खूनाचा गुन्हा पुणे शहर खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणला.खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर पथकसराईत गुन्हेगारांना चेक करीत असताना पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली कि, पुण्यातून कलिना मुंबई येथे जावून काही इसमांनी मुंबईस्थीत झो परेरा नामक इसमाचा खून करून मुळशी परिसरात टाकून दिले आहे. सदर बाबत पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर यांनी घटनेची गंभीरता व संवेदनशीलता ओळखुन सदरची माहिती अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा यांना दिली असता त्यांनी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखे कडील दोन पथक तयार करुन आरोपीचा शोध घेत असताना खंडणी विरोधी पथक २ यांनी पलंगे हॉटेल, खेड शिवापूर येथून गुन्हयात वापरलेल्या गाडी क्रमांकाचे आधारे १) अशोक महादेव थोरात वय ३५ वर्षे, रा. वारजे पुणे, २) गणेश साहेबराव रहाटे वय ३५ वर्षे, रा. ता. अकोले जि. अमरावती, ३) धीरज उर्फ बंटी लक्ष्मण साळुंके वय ४० वर्षे, रा. भवानी पेठ पुणे, ४) योगेश दत्तु माने वय ४२ वर्षे, रा. वारजे माळवाडी, पुणे यांना ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता त्यांनी दि.२०/१२/२०२३ रोजी कलिना, मुंबई येथे जावून आरोपी क्र.४ योगेश गाने याच्या गेव्हणी सोबत लीव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहणारा इसम नागे झो परेरा याचे आरोपीचे मेहुणी सोबत असलेल्या वादाचे कारणावरून मयत झो मॅन्युअल परेरा याचे घरामध्ये जावून त्याला घातक हत्याराने खून करून गळा आवळून खून करून त्याला टाटा गाडी गाडीमधून पुरावा नष्ट करण्याचे हेतूने मुळशी परीसरात रोडलगत असलेल्या झुडपामध्ये टाकून दिले असल्याचे सांगितले. पुढील कारवाईकामी गुन्ह्यात वापरलेली गाडीसह पौड पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.सदरची उल्लेखनीय कामगिरी ही पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)(पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे,सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, विजय गुरव, प्रदिप शितोळे, आशा कोळेकर, शंकर संपते, सैदोबा भोजराव, चेतन आपटे, पवन भोसले, अगोल पिलाणे, चेतन शिरोळकर, किशोर बर्गे, रुपाली कर्णवर यांनी केलेली आहे.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!