Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यातर्फे संशोधन शिष्यवृत्ती पात्रता परीक्षा घेण्यात येते. राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रावरुन ही परीक्षा घेण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ही परीक्षा घेण्यात आली. प्रवेशपूर्व परीक्षा सकाळी १० वाजता सुरू झाली. तेव्हा विविध परीक्षा कक्षात विद्यार्थी बसले होते.
विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रश्नपत्रिका वितरीत करण्यासाठी आल्या त्या खुल्या पद्धतीने आल्याचे सांगण्यात येते. विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेतला. काहीवेळ विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत परीक्षा कक्षातच प्रश्नपत्रिकाची बंद पाकिटे खुले करायला हवे होते, असे म्हणणे मांडले. काहीवेळ विद्यार्थी, प्रशासन यांच्यात संवाद साधला. त्यानंतर परीक्षा घेण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मागील काळात गैरप्रकार पाहता परीक्षेतील परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आजच्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर प्रश्नपत्रिका हाती पडली तेव्हा चक्क ‘सेट-२०१९’चा पेपरच असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. २०१९ मध्ये सेट-१ साठी हा पेपर होता तीच प्रश्नपत्रिका असल्याने पुन्हा परीक्षेबाबत अधिक संभ्रम निर्माण झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरमध्ये देवगिरी महाविद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातुर, बीड, जालना, लातूर, धाराशिव आदी जिल्ह्यातील विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.
सारथी ,बार्टी ,महाज्योती या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकाचे संच लिफाफा बंद देणे अपेक्षित असताना ते पूर्वीच उघडण्यात आले. परिक्षार्थींच्या परवानगी, अर्थातच समक्ष स्वाक्षरी घेऊन प्रश्नपत्रिका संच लिफाफा नियमानुसार उघडणे आवश्यक आहे. मागील काळातही महाज्योती या स्वायत्त संस्थेत मोठा गैरव्यवहार झाला. त्यामुळे आजच्या प्रकाराबाबत रितसर सारथी, बार्टी, महाज्योती यांच्या मुख्य व्यवस्थापकांना याबाबत तक्रार नोंदविली आहे. याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करून परिक्षेचे आयोजन पारदर्शक पद्धतीने करण्यात यावे, अशी मागणी युवाशाही असोसिएशनचे तुषार देशमुख यांनी केली.
आज झालेल्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी थेट सेट २०१९चा पेपर विद्यार्थ्यांना देण्यात आला. त्यासह परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे संच लिफाफा बंद नव्हते. याबाबत विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर ही जमले होते. या प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, असं विद्यार्थी गोविंद सूर्यवंशी यांनी म्हटलं.
मुद्रणालयाकडून पेपर लिफाफ्यात बंदच आले होते. आम्ही एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतच प्रश्नपत्रिकाचे लिफाफे उघडले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आक्षेप योग्य नाही. सेटचा पेपर रिपीट झाला का, याबाबत आम्हाला काही कल्पना नाही. परीक्षा सुरळीत पार पडली, असा दावा परीक्षा समन्वयक(छत्रपती संभाजीनगर) आर. एम. आहेरकर, उपकुलसचिव यांनी केला.
Read Latest Maharashtra News And Marathi News