Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

धक्कादायक! पत्रकाराच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीचे रुग्णालयातून पलायन

15

हायलाइट्स:

  • खून प्रकरणातील मुख्य आरोपीचं रुग्णालयातून पलायन
  • पोलिसांच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह
  • करोनाबाधित आरोपी पळून गेल्याने उडाली खळबळ

अहमदनगर : राहुरी येथील पत्रकार तथा माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे (वय ४६, रा. वांबोरी, ता. राहुरी) याने जिल्हा रुग्णालयातून पलायन (Murder accused escapes from hospital) केलं आहे. मोरे याला करोनाचा संसर्ग झाल्याने काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र शनिवारी सायंकाळी लघुशंकेचे निमित्त करून पोलिसांची नजर चुकवत तो पळून गेला.

पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी कान्हू मोरे याला अटक केली होती. मात्र आता त्याने पलायन केलं आहे. या खटल्याचं दोषारोपपत्र दाखल झालेलं असताना आरोपीने पलायन केल्याने पोलिसांसाठी हा मोठा धक्का आहे.

corona in maharashtra updates करोना: राज्यातील रुग्णसंख्येत किंचित वाढ; पुण्यात सर्वाधिक रुग्ण

शनिवारी सायंकाळी आरोपी मोरे याने पलायन केले. त्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून त्याचा शोध सुरू आहे. तो खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी तर आहेच शिवाय करोनाचा रुग्णही असल्याचे चिंता अधिक वाढली आहे. आरोपी मोरे हा पाच फूट उंचीचा असून, अंगात पिवळा शर्ट घातला आहे. मजबूत शरीर यष्टी आणि दाढी वाढलेली आहे. कोणाला आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मंदिरे १० दिवसांत उघडा, अन्यथा…; अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला इशारा

राहुरीतील पत्रकार दातीर यांचा ६ एप्रिल २०२१ रोजी खून झाला होता. प्रथम त्यांचे अपहरण केले आणि नंतर खून करून मृतदेह शहरात आणून टाकण्यात आला होता. सुरुवातीला या प्रकरणात पोलीस चालढकल करत असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर याचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यांनी काही दिवसांतच आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्याला अटक केली.

नेवासा फाटा येथील एका हॉटेलमध्ये तो लपून बसला होता. त्याचे अन्य साथीदारही पकडले गेले. आरोपी मोरे याला न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत होता. मधल्या काळात या गुन्ह्याचे दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल झालं आहे. आरोपी मोरे याने जमिनीच्या कारणावरून दातीर यांचा खून घडवून आणल्याचं तपासाच निष्पन्न झालं आहे.

न्यायालयीन कोठडीत असताना गेल्या आठवड्यात मोरे याला करोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे त्याला राहुरी येथून नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. त्याच्यावर पोलिसांची नजर होती. त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यास सांगण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी त्याने लघुशंकेचा बहाणा केला आणि पोलिसांची नजर चुकवून तो पळून गेला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.