Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Environmental threat to Mumbai: … तर सन २०५० पर्यंत मुंबईतील ‘हा’ भाग पाण्याखाली जाणार; पालिका आयुक्तांचा इशारा
हायलाइट्स:
- मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांचा मुंबईकरांना गंभीर इशारा.
- वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार.
- जागरूक नसलो तर सन २०५० पर्यंत दक्षिण मुंबईतील ८० टक्के भाग पाण्याखाली जाणार- इक्बाल चहल.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे मुंबई वातावरणीय बदल अॅक्शन प्लॅन योजनेच्या वेबसाईटचे आज लाँचिंग करण्यात आले. त्यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल बोलत होते. जगभरात वातावरणात बदल होत असल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम मुंबईवर देखील होत आहे. हाच मुद्दा आयुक्त चहल यांनी या कार्यक्रमात उपस्थित करत गंभीर इशारा दिला. वातावरणीय बदलांमुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन सन २०५० पर्यंत मुंबईतील नरिमन पॉईंट, मंत्रालय, दक्षिण मुंबईतील ए, बी. सी आणि डी वार्डमधील 80 टक्के भाग पाण्याखाली जाईल, असे ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणे यांना लागला विजेचा शॉक
निसर्ग आपल्याला वारंवार इशारे देत आहे. निसर्गाच्या इशाऱ्यानंतर आपल्याला जागरूक होण्याची आवश्यकता आहे. मात्र तरीही आपण जागरुक झालो नाही तर परिस्थिती धोकादायक होईल असे चहल म्हणाले. समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर याचा मोठा फटका दक्षिण मुंबईकील कफ परेड, नरीमन पॉईंट आमि मंत्रालय हा भाग ८० टक्के पाण्याखाली जाईल असे ते म्हणाले. ही स्थिती निर्माण होण्यासाठी फार काळ जावा लागणार नाही, तर फक्त २५ ते ३० वर्षांत ती स्थिती येणार आहे. याबाबत वेळीच विचार केला नाही तर परिस्थिती गंभीर होईल, असे चहल म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री-फडणवीस यांच्या भेटीवर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या…
मुंबई महानगर पालिकेने वातावरणीय बदलांबाबत अॅक्शन प्लॅन बनवण्यासाठी काम सुरू केले आहे. असे पाऊल उचलणारे मुंबई हे दक्षिण आशियातील पहिलेच शहर ठरले आहे. या प्लॅनअंतर्गत ज्या क्षेत्रांना धोका आहे, अशा क्षेत्रांचा अभ्यास करण्यात येणार आहे.
क्लिक करा आणि वाचा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कधी रिक्षा चालवताना पाहिलंय का?