Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सुशोभित मुंबईसाठी ७३५ कोटींचा खर्च, ऑडिट करण्याची माजी विरोधी पक्षनेत्यांची मागणी

9

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील सुशोभिकरणाच्या १२७८ कामांपैकी ११३० कामे पूर्ण झाली असून, गेल्या वर्षभरात यावर ७३५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र आधीची कामे पूर्ण होण्याआधीच सुरू केलेली काही नवी कामे रखडली आहेत. त्यामुळे ही कामे पूर्ण करण्याची मुदत आता मे-जून, २०२३वरून मार्च, २०२४पर्यंत वाढवण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेने १,७२९ कोटी रुपये खर्चाचा सुशोभिकरण प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत रस्ते, पूल, फूटपाथ, समुद्रकिनारे, उद्यानांमध्ये स्वच्छता, सुधारणा, हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना अशी १६ कामे केली जाणार आहेत. डिसेंबर, २०२२पासून या कामांना सुरुवात झाली. मुंबई पालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी १२ मार्च, २०२३ रोजी त्यांचा आढावा घेतला होता. कामे वेगाने पूर्ण करण्याचे वेळापत्रक तयार करावे, दिवे आणि फूटपाथ सुशोभिकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यावेळी दिले होते. ३१ मार्च, २०२३पर्यंत सुशोभिकरणाची ५० टक्के कामे पूर्ण झाली होती. पुन्हा एकदा बैठक घेऊन उर्वरीत कामेही वेगाने पूर्ण करण्याची सूचना आयुक्त चहल यांनी दिली होती. त्यावेळी १०८७ कामांपैकी ६१३ कामे पूर्ण झाली. आधीच्या कामांना गती देण्याऐवजी सुशोभिकरणाची आणखी कामे हाती घेण्यात आली. मात्र या कामांची रखडपट्टी सुरू झाली आहे. सुशोभिकरणाची कामे मे किंवा जून, २०२३पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. सध्या १२७८ कामांपैकी ११३० कामे पूर्ण झाली असून, यामध्ये ३८३ कामे मुंबई शहरातील आणि ७४७ कामे पूर्व आणि पश्चिम उपनगरातील आहेत.

पुण्याच्या कारभारी पदावरुन कोल्डवॉर, दोन दादांमधील तिढा सुटला? डीपीडीसी बैठकीत निधीवाटपाचे सूत्र ठरले

असा झाला खर्च

सुशोभिकरणासाठी प्रत्येक वॉर्डसाठी ३० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. यानुसार २४ वॉर्डना ७२० कोटी रुपये देण्यात आले. आत्तापर्यंत ५०० कोटी रुपये सुशोभिकरणावर खर्च करण्यात आले आहेत. उर्वरीत खर्च हा सुशोभिकरणांतर्गत रस्त्यांचे सपाटीकरण, फूटपाथसह रस्त्यांशी संबंधित अन्य कामांसाठी करण्यात येत आहे. त्यामुळे ७२० कोटी रुपयांव्यतिरिक्त १७० कोटी रस्ते आणि ६५ कोटी रुपये स्कायवॉकची सुधारणा, व विद्युत रोषणाई यावर खर्च करण्यात आले.

मुंबईतील सुशोभिकरणाचे व्यवस्थित नियोजन नाही. ही मुंबईकरांच्या पैशांची लूट आहे. काही ठिकाणी कामांची दुरवस्थाही झाली आहे. या कामाचे ऑडिट झालेच पाहिजे, ही आमची मागणी आहे. राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आलेल्या ऑडिट कामांमध्ये सुशोभिकरण कामांचेही ऑडिट होणे गरजेचे आहे. – रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका

कामांची दुरवस्था

सुशोभिकरणावर भरमसाठ खर्च झाला असला तरी मुंबईतील काही भागांत झालेल्या कामांची अल्पकाळातच दयनीय अवस्था झाली आहे. विद्युत खांब आणि झाडांना केलेली विद्युत रोषणाई काही ठिकाणी बंद आहे. तसेच हरितीकरण करताना विविध झाडांची दुरवस्था झाली आहे.

नुसती लुटमार करताय, मुंबई आणि महाराष्ट्राची सेवा करत नाहीत, आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.