Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मालेगाव शहर व घोटी परिसरात अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगणा-यांवर नाशिक ग्रामीण पोलीसांची कारवाई….
(नाशिक ) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ च्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांचे आदेशान्वये नाशिक ग्रामीण
पोलिसांनी अवैध शस्त्रे विरोधी मोहिम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती व अपर पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे आझादनगर पोलिस ठाणे हद्दीत शब्बीर नगर परिसर तसेच घोटी पोलिस ठाणे हद्दीत वासाळी परिसरात अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक २३/१२/२०२३ रोजी आझादनगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे मालेगाव शहरातील शब्बीरनगर परिसरात इसम नामे
१) अश्पाक अहमद शेख युसूफ, वय २४,
२)तारीक अहमद शेख युसूफ, वय २६, दोघे रा. शब्बीर नगर मालेगाव
यांचे ताब्यातुन एक लोखंडी धारदार तलवार व एक गोलाकार पाते असलेली धारदार कु-हाड जप्त केली आहे. सदर इसम हे काहीतरी
दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा करण्याचे उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीररित्या धारदार घातक शस्त्रे बाळगतांना मिळून आले असून त्यांचे विरूध्द आझादनगर पोलिस ठाणे गुरनं २३८ / २०२३
भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह भादवि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच घोटी पोलिस ठाणे हद्दीत वासाळी ते बारशिंगवे रोडवर, कचरवाडी-वासाळी शिवारात इसम नामे
१) संजय काशिनाथ गभाले, वय ३५,
२) सुधीर गोरख कोरडे, वय ३०, दोघे रा. वासाळी,
ता. इगतपुरी
असे त्यांचेकडील मारूती इको कारमध्ये एक धारदार तलवार विनापरवाना बेकायदा गुन्हेगारी कारवाया करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळून आले आहे. सदर इसमांविरूध्द घोटी पोलिस ठाणे येथे गुरनं ६१२/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह मुंबई पोलिस कायदा कलम ३७(१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आगामी नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ च्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांविरूध्द वरील प्रमाणे कारवाई करण्यात येणार असून कोणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच
दहशत निर्माण करीत असेल तर, नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे अवैध व्यवसायविरोधी हेल्पलाईन क्रमांक ६२६२ २५६३६३ यावर संपर्क करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.