Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सोसायटीतील फ्लॅटमध्ये दहशतवादी, पोलिसांना फोन, इमारतीखाली मोठा फौजफाटा अन् मग…

10

मुंबई: सोसायटीच्या आवारात दहशतवादी घुसल्याचा खोटा दावा करणाऱ्या गोराई गृहनिर्माण संस्थेचे ५८ वर्षीय अध्यक्ष भूषण नारायण पालकर यांना बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती मिळताच, रविवारी सकाळी मोठ्या संख्येने पोलिसांची पथकं घटनास्थळी दाखल झाली. अतिरिक्त फोर्सची मागणी करण्यात आली होती. सोसायटीला चारही बाजूंनी पूर्णपणे वेढा घातल्यानंतर पोलिसांनी आवारात आणि आसपासच्या रस्त्यावर सार्वजनिक प्रवेशाला बंदी घातली.

डीसीपी अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली झोन ११ मधील वरिष्ठ अधिकारी निनाद सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्योती भोपळे आणि बोरिवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप काळे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि ज्या खोलीला दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती देण्यात आली होती, त्या खोलीला वेढा घातला.

गॅस फुग्याच्या सिलिंडरचा अचानक स्फोट, सिलिंडर हवेत उंच उडाला अन् चिमुकल्याने जीव गमावला
दरवाजा ठोठावल्यानंतर पोलिस अधिकारी तातडीने घरात दाखल झाले. कसून शोध घेतल्यानंतर तिथे राहात असलेले मदन प्रजापती आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. ते दोन महिन्यांपासून भाडेकरू असून शेजारीच गिफ्ट शॉप चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.

“या घराचा मालक पप्पुराम सुतार (पाली, राजस्थानचा रहिवासी) त्याने प्रजापती आणि त्याच्या नातेवाईकांना खोली भाड्याने दिली होती. घराच्या झडतीदरम्यान काहीही संशयास्पद आढळून आले नाही”, अशी माहिती बोरिवली पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिली.

एअर इंडियाचे ऑपरेशन मॅनेजर पालकर यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती दिल्याचं तपासात आढळून आलं. घर क्रमांक १८ मध्ये राहणाऱ्या पालकर यांना मालक सुतार यांच्याकडून १७ क्रमांकाचे घर खरेदी करायचे होते. जेव्हा सुतार यांनी घर विकण्यास नकार दिला तेव्हा पालकर यांनी सुतार यांना मालमत्ता विकण्यासाठी मजबूर करण्यासाठी दहशतवाद्यांच्या उपस्थितीची खोटी माहिती दिली.

“आम्ही गुन्हा दाखल केला असून पालकरला भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली अटक केली आहे. त्याला हॉलिडे कोर्टासमोर हजर करण्यात आले आणि त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

लव्ह मॅरेज अन् दोन महिन्यांची मुलगी; हसतं-खेळतं कुटुंब एका रात्रीत संपलं, एक चूक ठरली जीवघेणी
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.