Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मयत रमेश फुले यांचे १२पर्यंत शिक्षण झाले असून त्यांच्या पश्चाताप दोन मुली, एक मुलगा पत्नी, आई – वडील, भाऊ- भावजय, पुतणे असा परिवार आहे. गुंठाभर ही शेती नाही अन शिकून नोकरीही नाही त्यामुळे घरप्रपंच भागविण्यासाठी तो शेत मजुरी करायचा. सत्तेवर आल्यावर पहिल्याच मंत्री मंडळात धनगरांना आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते, त्यानंतर ते सत्तेवर आले दरम्यान सरकार कोसळले ते पुन्हा एकदा सत्तेवर आले, पण धनगरांच्या तोंडाला पानेच पुसली गेली, मराठा आरक्षणाकडे सरकार गांभीर्याने पाहत आहे. मात्र धनगर आरक्षणाकडे साथ दुर्लक्ष केले जात आहे, अशी भावना तो नेहमीच व्यक्त करायचा.
धनगरांना एसटी आरक्षण मिळाले तर तरुणांना नोकरीच्या संधी अधिक मिळतील असे रमेश फुले यांना वाटायचे. पण एसटी आरक्षणासाठी धनगर आणि अनेक आंदोलने करूनही अद्याप आरक्षण मिळालं नाही त्यामुळे ते सतत नैराश्यात असायचे. रात्री ते कामानिमित्त बाहेर पडले अन घरी आलेच नाहीत. वडील जेवायचे थांबले होते. पण मुलगा घरी आला नाही सकाळी त्याने आत्महत्या केल्याचा निरोपच आला अन वर्धाक्याने खांगलेल्या बापाचा काळजाचा ठोका चुकला. आरक्षण काय असत नेमक कळत नाही पण आपला पोरगा नेहमी म्हणायचा नोकरी मिळते. आता काय करू मी मला फक्त माझा पोरगा आणून दया हो म्हणून त्याने टाहो फोडला. रमेशच्या आईची अन पत्नीची अवस्था याहून वेगळी नाही. पदरात असणाऱ्या लेकराचं कस करू. मी आता कस जगू असा सवाल रमेशची पत्नी करत आहे. या आक्रोशने आष्टा गाव हळहळले आहे.
रमेश फुले यांचा मृतदेह नाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. जोपर्यंत नोकरीचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मयत रमेश फुले यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. चाकूर तहसील समोर नातेवाईकांनी ठिय्या मांडला आहे. आता प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.