Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नांदेड पोलिसांनी सराईत घडफोड्यास अटक करुन,१२ गुन्हे व २५ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत….

9

पोलिस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हदीत 12 घरफोडी करणा-या सराईत आरोपीस अटक करुन त्यांचे कडुन 35 तोळे सोने,500 ग्रॅम चांदी व इतर साहीत्य असा एकुण 25,65000/- रुपयाचा
मुद्देमाल केला जप्त….

नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड शहरात दिवसेदिवस वाढत असलेल्या घरफोडीचे व चोरीचे घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयावर प्रतिबंध व गुन्हे उघड करणेबाबत श्रीक्रुष्ण कोकाटे, पोलिस अधिक्षक, नांदेड,अबिनाश कुमार अपर पोलिस अधिक्षक नांदेड यांनी वेळोवेळी नांदेड शहरातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. पोलिस निरीक्षक  सुर्यमोहन बोलमवाड पोलिस स्टेशन भाग्यनगर, नांदेड यांनी पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथकास मार्गदर्शन करुन घरफोडी व चोरीचे गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन केले त्याअनुषंगाने
दिनांक 26.11.2023 रोजी पोलिस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हदीतील फरांदेनगर येथील  रविंद्र जोशी महाराज यांचे घरी घरफोडी होवुन सोन्या चांदीचे दागिणे व इतर साहीत्य चोरीस गेल्याने पोलिस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथे गु.र.नं.452/2023 कलम 454,457,380 भा.दं.वि.प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. पोलिस स्टेशन भाग्यनगर पोलिस निरीक्षक  सुर्यमोहन बोलमवाड यांनी सदर घटने बाबत पोलिस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सदर घटनास्थळ व परिसरातील सि.सी.टिव्ही कॅमेरे चेक करुन आरोपीचा शोध घेणे कामी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अमंलदार यांनी गुन्हा घडल्यापासुन सतत 15 ते 20 दिवस फरांदेनगर, मौरचौक, छत्रपतीचौक, बजाजनगर, एकतानगर व नांदेड शहरातील विविध ठिकाणचे 200 ते 250 सि.सी.टिव्ही फुटेज चेक करुन सदर घर फोडी मधील आरोपीचे फुटेज हस्तगत करुन आरोपीची ओळख पटवली. दिनांक 23.12.2023 रोजी पोलिस स्टेशन भाग्यनगर गुन्हे शोध पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अमंलदार असे पोलिस स्टेशन हदीत घरफोडीचे गुन्हयातील व इतर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे कामी व पेट्रोलींग करीत असतांना एक इसम हा जिरायत मैदान परिसरामध्ये संशयीत रित्या फिरत असतांना दिसुन आला. तो पोलिसांना पाहुन पळुन जात असतांना गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी सदर इसमांचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले असता त्याचे बारकाईने निरीक्षण करता सि.सी.टिव्ही फुटेज मधील इसम व ताब्यातील इसम हा एकच असल्याची खात्री झाल्याने गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमंलदार याना त्यांचे ताब्यात एक लोखंडी रॉड, पक्कड व हातोडी असे घर फोडी करण्याचे साहीत्य मिळुन आले. सदर इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अभिजीत ऊर्फे अभय पिता देवराव राऊत वय 25 वर्षे व्यवसाय मजुरी रा. बेलानगर, भावसारचौक, नांदेड असे सांगितले. त्याचे कडील साहीत्या बाबत विचारल्याने त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यास पोलिस स्टेशनला आणुन सखोल चौकशी केली असता त्याने पोलिस स्टेशन भाग्यनगर हदीत विविध ठिकाणी वेगवेगळया वेळी घरफोडया केल्याचे कबुल केले.आरोपी अभिजीत ऊर्फे अभय पिता देवराव राऊत याने पोलिस स्टेशन भाग्यनगर
अभिलेखावर नोंद असलेला गु.र.नं.452/2023 कलम 454,457,380 भा.दं.वि. व इतर 11 अशा एकुण 12 घरफोडीच्या गुन्हयाची कबुली दिली आहे. त्याचे कडुन वरील 12 घरफोडी पोलिस स्टेशन भाग्यनगर अभिलेखावरील घरफोडीच्या गुन्हयातील 35 तोळे सोने,500 ग्रॅम चांदी लॅपटॉप, टिव्ही, मोबाईल, टॅब,कॅमेरा असा 25,65,000/-रुचा मुदेमाल जप्त केला
सदरची कामगिरी  श्रीकृष्ण कोकाटे ,पोलिस अधिक्षक, नांदेड, अबिनाश  कुमार , अपर पोलिस अधिक्षक, नांदेड,  सुरज गुरव ,उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग, नांदेड शहर, नांदेड, पोलिस निरीक्षक  सुर्यमोहन बोलमवाड यांचे मार्गदर्शनाखाली
गुन्हे शोध पथकातील अधिकारी पो.उप.नि. सुनिल भिसे व पोलिस अमंलदार पोहवा  दिलीप राठोड,  गजानन किडे, प्रदिप गर्दनमारे, पोशि ओमप्रकाश कवडे व हनवता कदम पोलिस स्टेशन भाग्यनगर नांदेड व सायबर सेल येथील पोहवा राजेंद्र सिटीकर यांनी पार पाडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.