Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पाटणकर चौकातील सुधारगृहात सध्या १५ बालगुन्हेगार आहेत. पलायन केलेल्या सहा बालगुन्हेगारांविरुद्ध चोरी, जबरी चोरी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास सहा बालगुन्हेगारांना खोलीतून बाहेर काढण्यात आले. त्यांची मोजणी सुरू असताना काही गुन्हेगारांनी दोन सुरक्षा रक्षकांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर सहाही जणांनी दोन रक्षकांवर हल्ला केला. त्यांना जबर मारहाण केली. एका रक्षकाकडील चावी हिसकावली. कुलूप उघडून सहाही जण पसार झाले. रक्षकांनी लगेच अधिकाऱ्यांना माहिती दिली. एका अधिकाऱ्याने कपिलनगर पोलिसांना कळविले.
माहिती मिळताच कपिलनगर स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांच्यासह पोलिसांचा ताफा सुधारगृहात पोहोचला. पोलिसांनी अपहरण, मारहाण व सुधारागृहातून पलायनाचा गुन्हा दाखल केला. पलायन करण्यात आलेल्या सहापैकी दोन जण गोंदियातील रहिवासी असून, अन्य कपिलनगर, हुडकेश्वर, कळमना व इमामवाड्यातील रहिवासी आहेत. बाल गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके स्थापन करण्यात आली असून, पोलिस बालगुन्हेगारांच्या निवासस्थानांसह, रेल्वे तसेच बसस्थानक परिसरात त्यांचा शोध घेत आहेत.
यापूर्वी फरार झाले ४३ जण
अल्पवयीन बालगुन्हेगारांना पाटणकर चौकातील मुलांच्या सुधारगृहात ठेवण्यात येते. २०१६ ते यावर्षीच्या एप्रिल महिन्यापर्यंत सुधारगृहातून ४३ मुलांनी पलायन केले. एप्रिल २०१६मध्ये डोळ्यात मिरची पूड फेकून कर्मचाऱ्याला मारहाण करून तब्बल २१ मुलांनी सुधारगृहातून पलायन केले होते. यावर्षी रविवारच्या घटनेपूर्वी सुधारगृहातून दोन मुले बेपत्ता झाली होती. सुधारगृहातून सतत मुले पलायन करीत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
नागपुरातील बालगुन्हेगारांची संख्या दृष्टिक्षेपात
घटना दाखल गुन्हे बालगुन्हेगारांची संख्या
खून ०९ १२
हत्येचा प्रयत्न २१ २२
जबरी चोरी २३ २८
दुखापत १०८ ११६
चोरी १३१ १४१
घरफोडी ५२ ५५
अन्य ६९ ९३
एकूण ४१३ ४६७