Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
when schools wil bel started?: राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत आरोग्यमंत्री टोपे यांचे मोठे विधान, म्हणाले…
हायलाइट्स:
- करोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण नसलेल्या भागात शाळा सुरू करण्याचा टास्क फोर्सचा विचार- राजेश टोपे.
- ५ सप्टेंबरपर्यंत शिक्षकांचे डबल लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार- टोपे.
- करोनाचे संकट टळलेले नसून काळजी घेण्याची आवश्यकता- टोपे.
राज्यात शाळा सुरू करायच्या असतील तर शिक्षकांचे लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षकांनी दोन्ही डोस घेतलेले असतील तर शाळा सुरू करणे शक्य होणार आहे. यासाठी आता राज्य सरकार विशेष प्रयत्न करणार आहे. याचाच एक भाग म्हणून शिक्षकांचे डबल लसीकरण करण्याबाबत विशेष मोहीम हाती घेण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे.
क्लिक करा आणि वाचा- Breaking ठाकरे सरकारला धक्का! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस
राज्यातील करोनाचा धोका टळलेला नसल्याचे सांगत आरोग्य मंत्री टोपे यांनी केरळ राज्याचे उदाहरण दिले आहे. केरळमध्ये ओणम उत्सवामध्ये ३० ते ३५ हजार लोकांना करोनाचा संसर्ग झाला होता. हे पाहता आपल्याला सावध होण्याची आवश्यकता असल्याचे टोपे म्हणाले. या संदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार करेल आणि त्याबाबतच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देतील असेही ते पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- योग्य वेळी सीडी लावणार, ती पोलिसांकडे दिली आहे; खडसे यांचा इशारा
‘टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय’
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय हा टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर घेतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्याबाबत लोकांमध्ये वेगवेगळी मते असल्याचे पवार म्हणाले. काही लोक म्हणतात की शाळा सुरू व्हायला हव्यात, तर काही लोकांना इतक्यात शाळा सुरू होणे अयोग्य असल्याचे वाटते. मात्र, या संदर्भात मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करतील आणि मगच अंतिम निर्णय घेतील, असे अजित पवार म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- जन आशीर्वाद यात्रेमुळे करोना वाढणार; अजित पवार यांचे टीकास्त्र