Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

घरात लपवून ठेवला 85 किलो गांजा, पोलिसांनी आरोपीसह घरच्यांवर…

17

घरात लपवून ठेवला 85 किलो गांजा, पोलिसांनी आरोपीसह घरच्यांवर…

धाराशिव (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांनी पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणुन परंडा पोलिसांचे पथक गस्तीस होते दरम्यान गस्तीस असताना पोलिसांना माहिती मिळाली की, भूम तालुक्यातील ईडा येथे एका व्यक्तीने घरामध्येच मोठ्या प्रमाणात 12.80,490 इतक्या रकमेची गांजाची साठवणूक केलेली आहे. अशी माहिती मिळताच त्या ठिकाणी छापा टाकून गांजा जप्त करून आरोपी सह घरातील राहणाऱ्या सर्व पाचही जणांना आरोपी करून परंडा पोलिस ठाण्यात 285/2023 कलम 8 (क), 20 (ब)ii (क), कलम 29 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम 1985 अंतर्गत गुन्हा नोंदवला.

या बाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांना (दि.24डिसेंबर) रोजी मौजे ईडा ता.भूम, जि.धाराशिव येथे संतोष संजय जाधव या व्यक्तिने फार मोठ्या प्रमाणात गांजाची साठवणूक केलेली आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीबाबत वरीष्ठांना कळवून पोलिसांचे पथक हे मौजे इडा येथे सदरील व्यक्तीच्या घरी शहानिशा करण्याच्या उद्देशाने गेले असता सदरील घर बंद असून दरवाज्याला कुलूप लावलेले आढळून आले. सदरील घर हे नमूद आरोपी संतोष संजय जाधव यांचेच असल्याबाबत पोलिस पाटील यांना विचारून खात्री केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महसूल विभागाचे प्रतिनिधी, वजन मापे निरीक्षक, दोन शासकीय पंच यांना सोबत घेऊन सदरील घरावरती घर मालकाच्या नातेवाईकांचे समक्ष छापा टाकण्यात आला. सदरील छाप्याच्या दरम्यान घरामध्ये 12.80,490 इतक्या रकमेचा एकूण 85 किलो 366 ग्रॅम एवढ्या वजनाचा गांजा या वनस्पतीचे पान, बोंड आणि बिया यांचा समावेश असलेले गुंगीकारक नशेसाठी वापरला जाणारा गांजा आढळून आला. घराची सखोल तपासणी करून सदरील गांजा शासकीय पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आला. इडा हे गाव पोलिस स्टेशन परंडा अंतर्गत येते तथापी पोलिस स्टेशन परंडापासून इडा हे गाव अंदाजे 25 किलोमीटर लांबीवर असून अत्यंत दुर्गम भागात वसलेले आहे याचाच फायदा घेऊन आरोपी संतोष संजय जाधव यांनी गांजा विक्रीचा व्यवसाय करून त्यातून पैसा कमवित होता आणि तरुण पिढीला नशेच्या खाईत ढकलित होता. परंतु परंडा पोलिसांनी आपल्या गोपनीय यंत्रणेला सक्रिय करून त्याच्याबाबत माहिती मिळवली आणि त्याच्यावर कारवाई करण्यामध्ये यशस्वी झाले.

सदरील प्रकरणात पोलिस स्टेशन परंडा येथे 285/2023 कलम 8 (क), 20 (ब)ii (क), कलम 29 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम 1985 अंतर्गत सहाय्यक पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार करीत आहेत. सदरील गुन्ह्यामध्ये घरातील राहणाऱ्या सर्व पाचही लोकांना आरोपी करण्यात आलेले असून आरोपींचे नाव संजय रामदास जाधव, बायडाबाई संजय जाधव, सूजराबाई रामदास जाधव, संतोष संजय जाधव आणि पूजा संतोष जाधव असे आहेत.

अशा प्रकारे सदरील कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ, पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक कविता मुसळे, पोलिस हवालदार दिलीप पवार, पोलिस नाईक काकडे, पोलिस नाईक गुंडाळे, पोलिस कॉन्स्टेबल योगेश यादव, पोलिस कॉन्स्टेबल कोळेकर, पोलिस कॉन्स्टेबल अडसूळ, चालक सचिन लेकुरवाळे आणि सरगर यांनी पूर्ण केली.

Leave A Reply

Your email address will not be published.