Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जबरी चोरीतील आरोपी अवघ्या १२ तासात स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद…
अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२६/१२/२३ रोजी फिर्यादी दर्शित हनुमान अग्रवाल रा मोरबाग हाऊस अमरावती यांनी पो.स्टे येवदा येथे तक्रार दिली की, त्यांचे कडे काम करणारे ड्रायव्हर प्रमोद ढोके व सौरभ साहु यांना अकोला येथे त्यांचे स्वताचे मालकीची रेनॉल्ड क्विट क एम एच २७ डी ए ६६९५ या कारने नदीम कादर रा. कोठडी बाजार अकोला यांच्या कडे जावुन पगडी रक्कम २३,०५,४८०/रु घेवुन आनणेकरीता पाठवीले असता ते दोघे पैशाची वसुली करून कार ने अमरावती करीता दर्यापूर रोडने येत असता लासुर गावाच्या समोर तिन अज्ञात इसमानी त्यांचे ताब्यातील कारला मोपेड गाडीने धडक मारली व त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच त्यांचे कडील मोबाईल व पैशाची थैली जबरदस्तीने हिसकावून घेवुन पळून गेले अशा तक्रारीवरुन पो.स्टे येवदा येथे अप नं ३२२/२३ कलम ३९४,३४१,३४, भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याअनुषंगाने
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक, विशाल आनंद यांनी सदर गुन्हा उघडकीस आनण्याकरीता करिता स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण व ठानेदार येवदा यांना आदेशीत केले होते.
स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील पथकाने सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना गुन्हयातील फिर्यादी कडून प्रथम गुन्हयाची पार्श्वभुमी समजून घेवून गुन्हयातील पिडीत सौरभ मनोज साहु वय २९ वर्ष रा. चेतनदास बगीचा, मसानगंज अमरावती तसेच प्रमोद नामदेवराव ढोके, वय ४२ वर्ष, रा. विलासनगर अमरावती यांना गुन्हयाबाबत सखोल विचारपुस केली असता दोघांचेही कथनामध्ये किरकोळ तफावत दिसुन आल्याने घटनेबाबत संशय निर्माण झाला होता. त्यामुळे सौरभ मनोज साहु याला पुन्हा विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने सांगीतले की, त्यांना पैशाची गरज असल्याने त्याने त्याचे साथीदार श्रीजीत मुरलीलाल साहू आणि प्रमोद नामदेवराव ढोके यांचे सोबत मिळून कट रचून गुन्हा केल्याची कबूली दिली व सर्व रक्कम श्रीजीत मुरलीलाल साहू याने सोबत नेल्याचे सांगीतले. वरून श्रीजीत मुरलीलाल साहू रा. पटवा चौक मशानगंज अमरावती यास ताब्यात घेवून त्याचे राहते घरून १) गुन्हयात चोरी केलेले एका लाल काळया रंगाचे बॅग मधील नगदी २३,०५,४८०/-रु २) गुन्हयात वापरलेली पांढ-या रंगाची अॅक्टीवा मोपेड क एम एच २७ ए.वाय ४८९२ किं. ७०,०००/-रू असा एकुन २३,७५,४८०/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.गुन्हयातील तिन्ही आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.
१) सौरभ मनोज साहु वय २३वर्ष रा चंदनदास बगीचा मशानगंज अमरावती
२) श्रीजीत मुरलीलाल साहु वय ३१ वर्ष रा पटवाचौक मशानगंज, अमरावती
३) प्रमोद नामदेवराव ढोके, वय ४२ वर्ष, रा. विलासनगर अमरावती या तिन्ही आरोपींना व जप्त मुददेमाल पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन येवदा यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांचे मार्गदर्शनाखाली, किरण वानखडे, पोलिस निरीक्षक स्था गु.शा अमरावती ग्रा यांचे नेतृत्वात पो.उप नि संजय शिंदे, अमलदार त्र्यंबक मनोहर, सुनिल महात्मे, शकील चव्हाण, सचीन मिश्रा, सुधिर बावने, सैयद अजमत, निलेश डांगोरे, सागर धापड, रितेश वानखडे यांचे पथकाने केली.