Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, महिला पोलिसासमोरच कोयता हल्ला, कोयता गँगची पुन्हा दहशत

174

पुणे: पुणे शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून थेट पोलिसांसमोरच कोयता हल्ला करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. मात्र, वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पुण्यात भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महिला पोलीस कर्मचाऱ्यासमोरच दोन गटांमध्ये कोयता हल्ला झाल्याची घटना वडगावशेरी या परिसरात घडली. या कोयता हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलं झाला असून पुण्यात खरचं कायदा व्यवस्था उरली आहे का असा सवाल विचारला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील वडगावशेरी परिसरात रात्रीच्या सुमारास दोन गटात झालेल्या वादातून ही घटना घडली आहे. दोन गटात झालेल्या वादातून कोयत्यानं हल्ला करण्यात आला. कोयता हल्ला होत असताना महिला पोलीस अधिकारी तिथे उपस्थित होती. मात्र पोलिसांना न जुमनता कोयता गँगने दुसऱ्या गटातील तरूणावर कोयत्याने वार केले. दोन गटात झालेल्या गँगवॉरमुळे स्थानिकामध्ये दहशतीच वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने डोके वर काढले आहे.

Guna Bus Accident : डम्परला धडकून बस पेटली, १३ प्रवाशांचा जळून कोळसा, मध्य प्रदेशात थरकाप उडवणारा अपघात

ही घटना दि. २४ रोजी रात्री ११:४५ च्या सुमारास वडगाव शेरी भागात घडली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तीन सराइतांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. अनुज जितेंद्र यादव, हरिकेश टूणटूण चव्हाण (वय १८), आकाश भरत पवार (वय २३), अमोल वसंत चोरघडे (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अक्षत तापकीर, राहुल बारवसे यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनुज, हरिकेश आणि आकाश सराइत गुन्हेगार आहेत. सौरभ संतोष पाडळे (वय २२ रा. पाडळे निवास, सोमनाथनगर, वडगाव शेरी) याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ पाडळेचा मित्र ऋषिकेश ढोरे याचे आकाशशी भांडण झाले होते. वाद मिटवण्यासाठी सौरभ मित्रांसह वडगाव शेरीतील दिगंबरनगर भागात आला होता. त्यावेळी आकाशने सौरभला मारहाण केली. अनुजने ऋषिकेशवर कोयत्याने वार केले. आरोपींनी शिवागाळ केली. यांना जिवंत सोडून नका, असे सांगून त्यांनी दगड फेकून मारले. सौरभचा मित्र अभी आगरकर आणि योगेश ऋषिकेशला वाचवण्यासाठी गेले. तेव्हा आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. आरोपींनी कोयते उगारून परिसरात दहशत माजविली. सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे तपास करत आहेत.

इन्स्टाग्रामवरील राग काढत साताऱ्यात डॉल्बीच्या ठेक्यावर नाचवल्या बंदुका आणि तलवारी; ५० जणांवर गुन्हा दाखल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.