Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुण्याचा प्रगत संगणन विकास केंद्र येथे विविध पदांची भरती सुरु; कोणत्याही अर्ज शुल्काशिवाय करा ऑनलाइन अर्ज

10

CDAC Recruitment 2023 : प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. सदर भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार आणि ल्लागार पदांच्या एकूण १८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

C-DAC: Centre for Development of Advanced Computing मधील या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले जाणार नसून, उमेदवारांना ८ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे (C-DAC, Pune)
पद संख्या : १८ जागा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

मुलाखतीचे ठिकाण :

ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसहHuman Resource Department Centre for Development of Advanced Computing Innovation Park, 34, B/1, Panchavati Road, Pune – 411 008.

या पत्त्यावर मुलाखतीसाठी ०२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहायचे आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे येथील भरतीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारचे इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, फिजिक्स / संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे.
  • पदवीधर / क्वांटम ऑप्टिक्स किंवा क्वांटम कम्युनिकेशनमध्ये पीएच.डी / क्वांटम फिजिक्समध्ये पीएच.डी / बी.ई./बी. टेक./ एम.ई/एम.टेक./ एमसीए / इंग्रजी/मास कम्युनिकेशनमधील प्रथम श्रेणी ६०%
  • पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी / पीएच.डी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / एम.ए./ विज्ञानातील कोणताही पदवीधर

(सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहीरात वाचावी.)

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.
  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत, ऑफलाइन / पोस्टाने किंवा कुरिअरने आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व शैक्षणिक कागदपत्रे देखील अपलोड करायती आहेत.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार Centre for Development of Advanced Computing कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

महत्त्वाच्या लिंक्स :

Centre for Development of Advanced Computing भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.