Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

४,००० रुपयांच्या डिस्काउंटसह OnePlus Nord 3 ची विक्री सुरु; मर्यादित कालावधीसाठी जबरदस्त ऑफर

10

OnePlus Nord 3 खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर आली आहे. ह्या फोनच्या लाँच प्राइसवर ४,००० रुपयांची जबरदस्त सूट दिली जात आहे. नव्या किंमतीसह हा फोन ई-कॉमर्स साइट Amazon आणि Flipkart वर विकला जात आहे. ह्या फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त ह्या ५जी फोनवर अनेक बँक ऑफर्स व EMI ऑफर दिल्या जात आहेत. ही कपात तात्पुरती आहे की कायमस्वरूपी हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही. परंतु लवकरात लवकर ह्या ऑफरचा फायदा घेणं उत्तम!

OnePlus Nord 3 च्या किंमतीत कपात

वनप्लस नॉर्ड ३ ५जीचा बेस व्हेरिएंट सध्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर २९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ह्या मॉडेलची लाँच प्राइस ३३,९९९ रुपये होती म्हणजे ह्या दोन्ही वेबसाइट वनप्लस नॉर्ड ३ स्मार्टफोन ४,००० रुपयांच्या थेट डिस्काउंटसह विकला जात आहे, ज्यात ८ जीबी रॅमसह १२८ जीबी स्टोरेज मिळत आहे.

लक्षात असू द्या की ही डील मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असू शकते. वनप्लस फोनवरील ही डिस्काउंट ऑफर कधी संपेल, हे मात्र अद्याप समजलेले नाही. त्यामुळे ज्यांना हा फोन खरेदी करायचा आहे त्यांनी ह्या ऑफरचा त्वरित लाभ घ्यावा. तुम्ही पुढे ह्या फोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स जाणून घेता येतील.

OnePlus Nord 3 5G चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord 3 5G मध्ये १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, १०-बिट कलर डेप्थ आणि एचडीआर१०+ सपोर्टसह ६.७४-इंचाचा सुपर फ्लूड अ‍ॅमोलेड पॅनल देण्यात आला आहे. OnePlus Nord 3 5G अँड्रॉइड १३ आधारित ऑक्सिजन ओएस १३.१ वर चालतो.

OnePlus Nord 3 5G मध्ये MediaTek Dimensity 9000 चिपसेट देण्यात आला आहे. डिव्हाइसमध्ये १६जीबी एलपीडीडीआर५एक्स रॅम आणि २५६जीबी पर्यंतची यूएफएस ३.१ स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये व्हर्च्युअल रॅमचा देखील ऑप्शन देण्यात आला आहे.

फोनमध्ये मागे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन सह ५०एमपीचा मुख्य कॅमेरा, ११२-डिग्री फिल्ड-ऑफ-व्यू सह अल्ट्रावाइड ८ मेगापिक्सलचा सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच, फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. OnePlus Nord 3 5G मध्ये पावर बॅकअपसाठी ८०W फास्ट चार्जिंगसह ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.