Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

new action plan against corona: करोनाची तिसरी लाट रोखणार; मुंबई महापालिकेचा हा ‘अॅक्शन प्लान’ तयार

9

हायलाइट्स:

  • मुंबईला करोनाच्या तिसरी लाट थोपवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा नवा ‘अॅक्शन प्लान’ तयार.
  • नव्या अॅक्शन प्लॅननसुरा आता करोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
  • महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी या संदर्भात नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली.

मुंबई: मुंबईला करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत मुंबई महानगरपालिका सावध झाली असून ही लाट थोपवून धरण्यासाठी महापालिकेने आपला कठोर नियमांचा ‘अॅक्शन प्लान’ तयार केला आहे. नव्या अॅक्शन प्लॅननसुरा आता करोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यात महत्वाचे म्हणजे सील करण्यात आलेल्या इमारतींवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, अशा इमारतींमधील रहिवाशांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात येणार आहे. तसेच बाहेरील व्यक्तींना देखील इमारतीत प्रवेश करण्याला मनाई करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी या संदर्भात नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली. या नव्या नियमांची कठोर अंमलबाजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. (mumbai municipal corporation prepares new action plan to curb third wave of corona)

क्लिक करा आणि वाचा- लाखाची लाच घेताना तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; शिपायावर देखील कारवाई

मास्क न लावणाऱ्यांवर होणार अधिक कठोर कारवाई

आता मास्क लावण्याच्या नियमावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. मास्क न लावणाऱ्यांवर अधिक कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट निर्देशच आयुक्त चहल यांनी सर्व २४ प्रशासकीय विभागांना दिले आहेत. या नियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘क्लीन-अप मार्शल’ची तात्पुरती नियुक्ती करण्यात येणार आहे. पोलिसांनी देखील ‘विना मास्क’ विषयक कारवाई अधिक तीव्र करावी अशा सूचनाही चहल यांनी पोलिस दलाला केल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! अनधिकृत फेरीवाल्याचा पालिका सहाय्यक आयुक्तांवर चाकूने हल्ला, दोन बोटे तुटली

काय आहेत महापालिकेच्या सूचना?

> पाच किंवा पाचपेक्षा अधिक कोविड बाधित रुग्ण आढळून आल्याने इमारत ‘सील’ करण्याच्या नियमाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व अधिक कठोरपणे करण्यात यावी
> बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सील करण्यात आलेल्या इमारतींमध्ये प्रवेश करण्यास कोणालाही अनुमती असणार नाही.
> इमारतींमध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला बाहेर पडण्यास मनाई असणार आहे. त्याचबरोबर अशा इमारतींमध्ये विविध कामांसाठी येणारे कामगार, वाहन चालक यांना देखील सदर कालावधी दरम्यान इमारतीमध्ये प्रवेश असणार नाही.
> सर्व सील इमारतींच्या गेटवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार.
> कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या ‘मास्क परिधान करणे’, ‘सामाजिक अंतर राखणे’ आणि ‘वारंवार योग्यप्रकारे साबणाने हात धुणे’, या ३ बाबींचे परिपूर्ण पालन सर्व ठिकाणी योग्यप्रकारे होत असल्याची खातरजमा करण्यात यावी. तसेच त्याबाबत जनजागृती नियमितपणे करण्यात यावी.
> योग्यप्रकारे मास्क परिधान न करणे, सामाजिक अंतर राखले न जाणे हे प्रकार आढळल्यास पुन्हा एकदा अधिक कडक निर्बंध लागू होऊ शकतात.
> मास्क न लावणाऱ्यांवर करण्यात येत असलेली दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश. त्यासाठी आवश्यक तेवढ्या संख्येतील ‘क्लीन-अप मार्शल’ ची तात्पुरती नियुक्ती करण्यात येणार.
> मुंबई पोलिसांद्वारे करण्यात येत असलेली ‘विना मास्क’ विषयक कारवाई देखील अधिक तीव्र करणार. यासाठी मनपा क्षेत्रात दररोज अधिकाधिक व्यक्तींवर कठोरपणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार.
> करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता महानगरपालिकेची सर्व रुग्णालये आणि जम्बो कोविड रुग्णालये यांना सतर्क व सुसज्ज ठेवण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश.
> ऑक्सिजनची केंद्रे सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये व जम्बो कोविड रुग्णालयांमध्ये क्षमतेची चाचणी घेण्यात यावी, तसेच रुग्णालयांमधील प्रत्येक ऑक्सिजन बेडपर्यंत ऑक्सिजन योग्यप्रकारे व योग्य प्रमाणात पोहोचत असल्याची खातरजमा करणे.
> करोना चाचण्या लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी महापालिका क्षेत्रात २६६ कोविड चाचणी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.
> तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) अद्ययावत करण्यात यावेत.
> महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून ५ वेळा निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करावे.
> महानगरपालिका क्षेत्रातील १८ वर्षे आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या सुमारे ७४ टक्के नागरिकांचे एक लसीकरण झालेले असून उर्वरित २६ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे.
> कोविड व्यतिरिक्त हिवताप (मलेरिया), डेंग्यू या आजारांबाबत देखील सजग व सतर्क राहावे.

क्लिक करा आणि वाचा- ‘ठाकरे सरकारचे ‘घोटाळा इलेव्हन”; किरीट सोमय्यांचे ‘या’ ११ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.