Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणी वाढल्या.
- पारनेरमधील कार्यकर्त्यांची लोकायुक्तांकडे तक्रार.
- पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप.
वाचा:ईडीची कारवाई: जयंत पाटील यांनी भाजपवर केला ‘हा’ गंभीर आरोप
पारनेर तालुक्यातील राहुल झावरे, संदीप चौधरी, ज्ञानेश्वर लंके व सुहास सालके यांनी ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यांच्यावतीने पुण्यातील अॅड. असीम सरोदे, अॅड. अजित देशपांडे व अॅड. अक्षय देसाई यांनी ही ऑनलाइन याचिका सोमवारी दाखल केली आहे. महाराष्ट्राच्या लोकायुक्त पदावर नुकतीच न्यायमूर्ती विद्याधर कानडे यांची नियुक्ती झाल्यानंतर दाखल झालेले हे पहिलेच मोठे प्रकरण ठरले आहे.
वाचा:… म्हणून नारायण राणे आज अलिबाग पोलिसांसमोर हजर झाले नाहीत
या याचिकेत देवरे यांच्यावर तक्रारदारांनी अनेक आरोप केले आहेत. स्वतःच्या लोकसेवक पदाचा गैरवापर करून व्यक्तिगत हितासाठी, भ्रष्ट हेतुने अनेक पातळ्यांवर भ्रष्टाचार करणे, वाळूमाफियांना परस्पर कारवाईमुक्त करणे, बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे ट्रॅक्टर, डम्पर, जेसीबी मशीन्स व पोकलेन अशी वाहने कोणतीही तडजोड शुल्क सरकारला जमा न करता परस्पर सोडून देणे अशा अनेक प्रकरणात ज्योती देवरे यांनी तब्बल पाच कोटी, ९४ लाख रुपयांच्यावर घोटाळा केला आहे, असा आरोप लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. यासंबंधी अनेक पुरावे याचिकेसोबत जोडण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या चौकशीच्या अहवालाचाही आधार घेण्यात आला आहे. नगरच नव्हे तर धुळे येथे कार्यरत असतानाच्या काळातील तक्रारींचाही यामध्ये समावेश आहे.
वाचा:राज्यात करोना रुग्णसंख्येमध्ये घट; तिसऱ्या लाटेचा धोका असतानाच…
यासंबंधी याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. सरोदे म्हणाले, ‘हे अतिशय दुर्दैवी आणि विरोधाभासी चित्र आहे की देवरे या सध्या ज्या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत त्याच तालुक्यात समाजसुधारक आणि भ्रष्टाचार विरोधातील अग्रगण्य व्यक्तिमत्व अण्णा हजारे यांचे गाव राळेगणसिद्धी देखील आहे. हजारे हे लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी व भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी लढत आहेत. लोकसेवेत असलेल्या व्यक्तीने विविध मार्गांनी भ्रष्टाचार करणे, झटपट पैसा मिळविण्यासाठी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करणे, अपारदर्शक व्यवस्थापन असणे व जनतेच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेल्या नागरिकांसाठीच्या सनदेचे पालन न करणे हा ‘कुप्रशासनाचा’ भाग आहे. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण प्रशासन व लोकशाहीवरील सामान्य माणसाचा विश्वास कमी होणे धोकादायक आहे.’
वाचा : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीनचिट?; सीबीआयने दिले स्पष्टीकरण