Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नव्या वर्षात लोकलचा प्रवास अधिक सुखकर होणार, लोकलच्या २० फेऱ्या वाढणार

9

महाराष्ट्र टाइम्स -म. टा. प्रतिनिधी, मुंबई: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा लोकल प्रवास नव्या वर्षात अधिक आल्हाददायक होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात नव्या वर्षात दोन नव्या वातानुकूलित लोकल दाखल होणार आहेत. सध्या धावत असलेल्या लोकलच्या तुलनेत नव्या लोकलमध्ये वाढीव प्रवासी आसन क्षमता असणार आहे. यात महिलांसाठी २४ टक्के आसने राखीव असणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर धावत असलेल्या एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढता आहे. प्रवाशांकडून एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र एसी लोकल नसल्याने फेऱ्या वाढवणे शक्य नव्हते. रेल्वे मंडळाने चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीला (आयसीएफ) दोन वातानुकूलित लोकल बांधणीच्या सूचना दिल्या आहेत. पश्चिम रेल्वेला पहिली लोकल फेब्रुवारी आणि दुसरी लोकल मार्चमध्ये मिळणे अपेक्षित आहे. नव्या लोकल मेधा बनावटीच्या असणार आहेत. लोकल प्राप्त झाल्यानंतर नव्या वर्षात एसी फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे, असे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी सांगितले.

मुंबईत धावत असलेल्या भेल बनावटीच्या एसी लोकलची आसन क्षमता १,०२८ आहे. मेधा बनावटीच्या लोकलची क्षमता १,११८ आहे. यामुळे मुंबईकरांना वाढीव आसन क्षमतेच्या लोकलमधून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. पश्चिम रेल्वेवर ७ लोकल गाड्यांच्या ९६ लोकल फेऱ्या धावतात. नव्या लोकलमुळे किमान २० फेऱ्या वाढण्याचा अंदाज आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बारा डब्यांच्या मेधा बनावटीच्या लोकलमध्ये १,११८ आसने असून यात महिलांसाठी २७४ आसने असणार आहेत. सर्वसामान्य प्रवाशांसाठी ७८२ आसने असतील. लोकलचे सर्व डबे एकमेकांना जोडलेले असल्याने प्रवाशांना एका डब्यातून शेवटच्या डब्यापर्यंत जाण्याचा पर्यायही उपलब्ध होणार आहे, असे आयसीएफमधील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

एसी लोकलच्या सोमवार ते शुक्रवार ९६ फेऱ्या आणि शनिवार-रविवारी ५३ फेऱ्या धावतात. पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलसाठी १ ते २६ डिसेंबरदरम्यान ४,७२,५४९ तिकिटांची आणि ३२,३१५ पासची विक्री झाली आहे. २६ डिसेंबरपर्यंत २५,१४,७७८ प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला आहे.

nullRead Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.