Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- राज्यात मुसळधार पावसामुळे पुन्हा धोका वाढला
- लातूर जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी
- नगर जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असून अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
लातूर जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी (latur weather today)
काही दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाने लातूर जिल्ह्यात आज चांगलीच हजेरी लावली. रात्री आणि सकाळी झालेल्या पावसाने शेतकरी आनंदला असला तरी काही भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर, औसा, निलंगा, अहमदपूर यासह इतर तालुक्यात काल रात्री पासुन पावसाने दमदार हजेरी लावली. एका बाजूला पिकास या पावसामुळे जीवदान मिळत असताना काही भागात पिके आडवी झाली आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
काही ठिकाणी पिकांचे नुकसान
जिल्ह्यातील तपसेचिंचोली, गाडवेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे ऊस मोठ्या प्रमाणावर आडवा पडला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याप्रमाणेच बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात मूग, उडीद, मका या पिकाचे नुकसान झाले आहे. एकीकडे सोयाबीन वर गोगलगाई हल्ला करून सोयाबीन फस्त करत आहेत, तर दुसरीकडे वादळी वारा आणि पावसामुळे उसाचे नुकसान होत आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली जात आहे.
नगर जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस (ahmednagar rain forecast)
बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठावाडा विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातही काल रात्रीपासून संततधार सुरू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून पाथर्डी तालुक्यात १९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. पाथर्डी तालुक्यात घरे पडली, पिकांचेही नुकसान झाले आहे. पुढील काही तास पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवान विभागाने वर्तविला आहे. (heavy rains in the maharashtra weather at my location mumbai pune rain weather news todays live)