Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ एप्रिलमध्ये, २७४ जागांवर महाभरती

11

MPSC Recruitment 2024 : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ चे आयोजन करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, मृद व जलसंधारण विभाग आणि महसूल व वन विभागातील गट-अ व गट-ब संवर्गातिल जागांवर या भरतीच्या माध्यमातून नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल २७४ जागा भरल्या जाणार आहेत. सदर पदांकरीता आवश्यक पात्रता असणार्‍या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत. पदभरतीचा सविस्तर तपशील, महत्त्वाच्या तारखा आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्या.

पदभरतीचा तपशील :

एकूण रिक्त जागा : २७४

भरली जाणारी पदे :

  • राज्य सेवा, गट अ व गट ब (सामान्य प्रशासन विभाग) : २०५ जागा
  • महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, गट अ व ब (मृद व जलसंधारण विभाग): २६ जागा
  • महाराष्ट्र वन सेवा, गट अ व गट ब (महसुल व वन विभाग) : ४३ जागा

आवशयक शैक्षणिक पात्रता :

महाराष्ट्र शासनाच्या या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून, त्याबद्दल माहिती खालीलप्रमाणे :

० राज्य सेवा, गट अ व गट ब – सामान्य प्रशासन विभागातील पदांसाठी :

कोणत्याही शाखेतील पदवी अथवा ५५ टक्के गुणांसह बी.कॉम + सीए / आयसीडब्ल्युए + एमबीए अथवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवशयक आहे.

० महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, गट अ व ब – मृदा व जलसंधारण गातील पदांसाठी :

सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.

० महाराष्ट्र वन सेवा, गट अ व गट ब – महसुल व वन विभागातील पदांसाठी :

उमेदवार हे रसायनशास्त्र / वनस्पतीशास्त्र / गणित / भौतिकशास्त्र / सांख्यिकी / प्राणीशास्त्र / उद्यानविद्या / कृषी पदवी अथवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.

वयोमर्यादा :

  • सदर पदांकरीता उमेदवाराचे वय हे दिनांक ०१ एप्रिल २०२४ रोजी किमान वय हे १८ वर्षे तर कमाल वय हे ३८ वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे.
  • यामध्ये मागास प्रवर्ग / अनाथ प्रवर्ग करीता वयांमध्ये ०५ वर्षांची सुट देण्यात येणार आहे.

(सविस्तर महितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा)

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि कालावधी :

१. अर्ज सादर करण्याचा कालावधी : ०५ जानेवारी २०२४, दुपारी २.०० वाजल्यापासून ते २५ जानेवारी २०२४, रात्री ११.५९ पर्यंत

२. ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिवस : २५ जानेवारी २०२४, रात्री ११.५९ पर्यंत

३. भारतीय स्टेट बँके (SBI) मध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिवस : २८ जानेवारी २०२४, रात्री ११.५९ पर्यंत

४. ऑनलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याच शेवटचा दिवस : २९ जानेवारी २०२४, बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये

अर्ज शुल्काविषयी :

जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या अधिकृत संकेतस्थळावर वर नमूद केलेल्या कालावधीच्या आधारे भरायचे आहेत.

सदर पदभरती प्रक्रियेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५४४ रुपये तर मागास प्रवर्ग / अनाथ प्रवर्ग करीता ३४४ परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
महत्त्वाच्या लिंक्स :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२४ ची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२४ साठी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.