Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जनतेला धान्य स्वस्त अन मोफत, रेशनदुकानदार मात्र अस्वस्थ; नववर्षापासून विक्री बंद, फुकटची हमाली वाढल्याने मनस्ताप

7

कोल्हापूर: मतावर डोळा ठेवत देशात आणि राज्यातही रेशनवर स्वस्त आणि मोफत वस्तू देण्याची घोषणा दिवसेंदिवस वाढत आहेत, मात्र त्याच्या वितरणाची जबाबदारी असलेल्या रेशन दुकानदारांची यामुळे कोंडी होत आहे, तुटंपूजे कमिशन, पॉस मशीनमध्ये सतत होणारा बिघाड, नसलेल्या सुविधा यातून होणाऱ्या मनस्तापाबरोबरच ‘फुकटची हमाली’ वाढल्याने त्रस्त झालेले हे वितरक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. नवीन वर्षाच्या शुभारंभापासून त्यांनी देशभर बेमुदत विक्री बंदची हाक दिल्याने वस्तू मिळणे कठीण होणार आहे.

गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ देशात सर्वसामान्य जनतेला रेशनवर स्वस्त धान्य वितरित केले जाते. याचा लाभ देशातील जवळजवळ पंधरा कोटीपेक्षा अधिक जनतेला होत आहे. निवडणुकीत मतावर डोळा ठेवून अशा दुकानांतून अधिकाधिक वस्तू देण्याची घोषणा होत आहे. मात्र, वितरकांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

पूर्वी या वितरकांना चांगले कमिशन आणि वरकमाई होत होती. आता मात्र, विक्री ऑनलाइन झाल्याने त्यावर मर्यादा आल्या आहेत. फाइव्ह जी च्या जमान्यात टूजी ची सुविधा असलेल्या पॉश मशीन, एक देश, एक रेशन उपक्रमासाठी नसलेली सुविधा, तुटपुंजे कमिशन, इतर वस्तू विक्रीसाठी नसलेली परवानगी, वाढत असलेले लाभार्थी, अन्न सुरक्षा व मोफत धान्य वाटप, आनंदाचा शिधा सारखे सततचे नवनवीन योजना या सर्व पार्श्वभूमीवर दुकानदारांच्या पदरात फारशे काही पडत नसल्याने ते अस्वस्थ आहेत.

सरकारच्या पातळीवर आपल्या मागण्यासाठी दुकानदारांनी अनेकदा मागण्या, आंदोलन केले. त्याची दखल न घेतल्याने अखेर देशव्यापी विक्री बंदचे हत्यार उपसण्यात आले आहे. एक जानेवारीपासून देशातील सर्व यामुळे दुकाने बंद राहणार आहेत. यामुळे नवीन वर्षाच्या सुरूवातीपासून रेशनवरील धान्य मिळणार नसल्याने जनतेलाही त्याचा फटका बसणार आहे.

रेशन दुकान

भारतातील दुकाने : ५ लाख ३८ हजार

महाराष्ट्रातील दुकाने : ५३ हजार

देशातील लाभार्थी : १४ कोटी

महाराष्ट्रातील लाभार्थी : १ कोटी ६४ लाख

एका दुकानाचे लाभार्थी : ५०० ते ६००

मिळणारे कमीशन : १०० किलो विक्रीला १५० रू.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.