Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नववर्षाच्या जल्लोषाचे काऊंटडाऊन सुरु; नागपुरात लेटनाइट पार्टी अन् कौटुंबिक कार्यक्रमचे आयोजन

5

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असून जल्लोषासाठी काऊंटडाउन सुरू झाले आहे. नववर्षांच्या स्वागतासाठी अनेक जण विविध ठिकाणी फिरायला जात असतात. बाजारपेठा विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. याबरोबर खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत धमाल मस्तीचे नियोजन करण्यात आले आहेत. तरुणाईदेखील थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असून पब आणि रेस्टॉरंटमध्ये गर्दीस सुरुवात झाली असून पब, हॉटेल, रेस्टॉरंट मालकांनीही जय्यत तयारी केली आहे.

मावळत्या २०२३ला निरोप देण्यासाठी आणि २०२४च्या स्वागतासाठी संत्रानगरी सज्ज झाली आहे. विशेषता तरुणाईमध्ये जोशपूर्ण वातावरण आहे. स्वागताच्या पद्धतीतही वैविध्य बघावयास मिळत आहे. कुठे आधुनिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यावर भर आहे, तर कुठे पारंपरिक सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. व्यावसायिकांनी कौटुंबिक उत्साह व तरुणाईमधील जल्लोष बघता त्यांच्यासाठी वेगवेगळी व्यवस्था केली आहे. नववर्षानिमित्त हॉटेल्समध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त पर्यटक आपल्याकडे यावेत, त्यासाठी इमारतीला रंगरंगोटी, विद्युत रोषणाई तसेच जेवणासाठी विविध चवदार पदार्थ उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.

बाजारपेठाही फुलल्या

अंबाझरी, सिव्हिल लाइन्स, शंकरनगर, धरमपेठ, फुटाळा तलाव, वर्धमाननगर, मेडिकल चौक आदी भागांत नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात एकत्र येते. सीताबर्डी, सदर, इतवारी, महाल, धंतोली, धरमपेठ, सक्करदरा आदी बाजारपेठांमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध वस्तू दाखल झाल्या आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीला भेट देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बाजारपेठांमध्येही गर्दी बघावयास मिळत आहे. फटाक्यांच्या दुकानांतही गर्दी दिसून येत आहे. थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करणाऱ्यांसाठी हॉटेल व्यावसायिकांनी व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन असे आकर्षक पॅकेज देऊ केले आहेत.
Bye Bye 2023: नववर्ष स्वागतास छत्रपती संभाजीनगर झाले सज्ज, सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
सामाजिक उपक्रमही

नववर्षाचा आनंद आपल्यातच साजरा करण्यापेक्षा समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्यासोबत नववर्ष साजरा करण्याचे प्लानही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आखले आहेत. त्याअंतर्गत स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, रुग्णांना फळवाटप, औषधांचे वाटप, शालेय साहित्याचे आणि खाद्यपदार्थांचे वितरण करण्यात येणार आहे.

पर्यटनस्थळे फुल्ल

नववर्षाच्या स्वागतासाठी अंबाझरी, फुटाळा असे विविध तलाव, करमणूक पार्क्स व धार्मिकस्थळांसह रामटेक-खिंडसी, अदासा, रावणवाडी, गोसेखुर्द, पेंच, नवेगावबांध, अंबाखोरी, तोतलाडोह, ताडोबा, बोर धरण, कोलितमारा, इटियाडोह आदी पर्यटनस्थळे ‘फुल्ल’ राहणार आहेत. अनेकांनी या ठिकाणी जाऊन नववर्ष आगमनाचा आनंद साजरा करण्याचा बेत आखला आहे.

टेरेसवरच सेलिब्रेशन

ठिक बाराच्या ठोक्याला केक कापण्यात येईल. पुष्पवर्षाव करणे, देवापुढे नारळ फोडून नववर्ष सुखाचे जाऊ देण्याची प्रार्थना करणे, नातलग व मित्र मंडळींना शुभेच्छा देणे, फटाक्यांची रंगबिरंगी आतषबाजी करणे, नृत्य व गायन करणे, स्वादिष्ट भोजन, असे खास बेत आखण्यात आले आहेत. तर हॉटेल्स, क्लबमध्ये जाऊन नवीन वर्षाचा जल्लोष करणे शक्य नसलेल्यांनी आपल्या इमारतींच्या टेरेसवरच सेलिब्रेशन करण्याची तयारी चालविली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.