Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अग्रीतांडवात मृत झालेल्यांत एका ज्येष्ठ कामगा आणि एका अठरा वर्षीय युवकाचाही समावेश आहे. अग्रिशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुश्ताक शेख (वय ६५), कौशर शेख (३२), इक्बाल शेख (१८), ककनजी (५५), रियाजभाई (३२), मरगुम शेख (३३) मृतांची नावे आहेत. घाटीत दाखल केलेले मृतदेह जळीत नव्हते. काही कामगारांचा धूरात गुदमरून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर २१६ मध्ये साबिर शब्बीर शेख राहणार किराडपुरा यांची सनशाइन एंटरप्राइजेस नावाची कंपनी आहे या कंपनीत हात मोजे बनवण्याचे काम चालते. या कंपनीमध्ये असमुद्दिन मुस्ताक शेख हे ठेकेदार आहेत. या सोबतच त्यांची पत्नी किस्मत परवीन शेख, मुलगा मोहम्मद मुजमीन शेख, मुलगी आयेशा शेख यांच्यासह १८ कामगार काम करत होते. यातील बहुतांश कामगार हे बिहार येथील असल्यामुळे ते कंपनीत काम करून तिथेच राहत होते.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी कामातून सर्वजण जेवण करून झोपल्यानंतर रविवार दिनांक ३१ रोजी पहाटे साडेबारा वाजता कंपनीला भीषण आग लागली. यावेळी कंपनीत असलेले सर्वजण झोपलेले होते. आग लागल्याचे लक्षात येताच काही जणांनी कंपनीच्या बाहेर धाव घेतली. तर, यातील सहा जण कंपनीच्या आत अडक, दरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतच अग्निशामक दलाचे दोन बंब व बजाज ऑटो व महानगरपालिकेचे दोन व चिखलठाणा अग्निशामक दलाचे असे एक असे एकूण सहा अग्निशामक दलाचे बंब वाळूज एमआयडीसीतील या कंपनीच्या समोर दाखल झाले दरम्यान न अग्निशामक दलाच्या अर्थ प्रयत्नानंतर ही आज पाठवताना आणि क्षमस दलाच्या जवानांना यश आले.
Read Latest Maharashtra News And Marathi News