Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
धाराशिव पोलिसांनी केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या एका लॉज वरील सेक्स रॅकेट उघड केल्यानंतर पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या पथकाने उमरगा येथील रॅकेट उघड केले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे पथक जिल्हयातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी (दि.३०डिसेंबर) रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली कि उमरगा येथील आरोग्य नगरी येथील शांतादुर्गा लॉज चालक – व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद लॉजवर छापा टाकला असता लॉज मध्ये एक महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता हॉटेल चालक १) धनराज हरिश्चंद्र तेलंग, (वय ४२ वर्षे), व्यावसाय मॅनेजर (शांतादुर्गा लॉज), रा. न्यु बालाजी नगर उमरगा, जि.धाराशिव २) रविंद्र महादेव महतो, (वय ३५ वर्षे), व्यावसाय- वटर (शांतादुर्गा लॉज), रा.कमरवली थाना पिपराही जि.शिवहर, राज्य बिहार ह.मु. शांतादुर्गा लॉज ता. उमरगा, जि.धाराशिव, (लॉज मालक) ३) आशा रामचंद्र तेलंग रा.उमरगा, ता.उमरगा, जि.धाराशिव यांच्या सांगण्यावरुन त्या महिलेस वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देऊन तिस लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करून नमुद तिघेजण त्यावर स्वतःची उपजिवीका करत आहेत असे समजले. या वरुन पथकाने लॉज मॅनेजर नामे- १) धनराज हरिश्चंद्र तेलंग, (वय ४२ वर्षे), व्यवसाय मॅनेजर (शांतादुर्गा लॉज), रा. न्यु बालाजी नगर उमरगा, जि.धाराशिव २) रविंद्र महादेव महतो, (वय ३५ वर्षे), व्यावसाय वटर (शांतादुर्गा लॉज), रा.कमरवली थाना पिपराही जि.शिवहर, राज्य बिहार ह.मु. शांतादुर्गा लॉज ता.उमरगा, जि.धाराशिव, यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील दोन मोबाईल फोन, नोंदीचे रजिस्टर, रोख रक्कम ८,३०० व निरोधची पाकीटे, लोखंडी पलंगावरील बेडसीट असा एकुण २८,३०० ₹ माल हस्तगत केला.
त्या नंतर पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलेची सुटका करुन (लॉजमालक) १) आशा रामचंद्र तेलंग रा. उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव लॉज मॅनेजर-२) धनराज हरिश्चंद्र तेलंग, (वय ४२ वर्षे), व्यावसाय मॅनेजर (शांतादुर्गा लॉज), रा. न्यु बालाजी नगर उमरगा, जि.धाराशिव ३) रविंद्र महादेव महतो, (वय ३५ वर्षे), व्यवसाय वटर (शांतादुर्गा लॉज), रा.कमरवली थाना पिपराही, जि.शिवहर, राज्य बिहार ह.मु. शांतादुर्गा लॉज ता.उमरगा, जि.धाराशिव, यांचेविरुध्द गुरनं ७०१/२०२३ भा.दं.वि. सं. कलम ३७०, ३७० (अ) (२), ३४ सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ४, ५ अन्वये उमरगा पोलीस ठाण्यात दि.३०डिसेंबर रोजी गुन्हा नोंदवला.
अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या पथकाने केली आहे.