Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत मुंबईत ३२३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण २७२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण १ करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख २२ हजार ६२१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ९७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०५ टक्के इतका आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता १ हजार ५११ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.
क्लिक करा आणि वाचा- चिंतेत भर! राज्यात आज नव्या करोना रुग्णांची वाढ; मृत्यूही वाढले
मुंबईत आज ३० हजार ४२१ चाचण्या
मुंबईत आज एकूण ३० हजार ४२१ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये एकही सक्रिय कंटेनमेंट झोन नसून एकूण २९ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा- शेवगावात पुराचा वेढा; नद्यांना पूर, एनडीआरएफचे पथक दाखल
आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती
२४ तासांत बाधित रुग्ण – ३२३
२४ तासात बरे झालेले रुग्ण – २७२
बरे झालेले एकूण रुग्ण – ७२२६२१
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%
एकूण सक्रिय रुग्ण- ३१०६
रुग्ण दुपटीचा कालावधी- १५११ दिवस
कोविड वाढीचा दर (२४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट)- ०.०५ %
क्लिक करा आणि वाचा- शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे; चंद्रकांत पाटील यांचा निशाणा